Indian Railway Viral Post : सणसुदीच्या काळात ट्रेनमध्ये कन्फर्म सीट मिळणं फार अवघड असतं. कारण या काळात लाखो लोक ट्रेनने प्रवास करतात. अशावेळी कन्फर्म तिकीट मिळणे तर दूरच, ट्रेनमध्ये पाय ठेवायला जागा शिल्लक नसते. अनेकदा लोक ट्रेनच्या टॉयलेटमध्ये बसून तर कधी खिडकी आणि दरवाजाला लटकून प्रवास करतात. सणाच्या दिवशी घरी पोहोचण्यासाठी प्रवासी जीवाची पर्वा न करता असा जीवघेणा प्रवास करतात, ज्याचे अनेक व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशातच एका युजरने रेल्वे प्रवासादरम्यानचे एक भीषण वास्तव समोर आणले आहे. युजरने ट्रेनच्या टॉयलेट आणि दरवाजाच्या मधील जागेत बसलेल्या त्याच्या बायकोचा फोटो पोस्ट केला आहे. ही पोस्ट त्याने केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना टॅग केली. दरम्यान, ही पोस्ट आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेक जण त्यावर तीव्र संताप व्यक्त करत आहेत.
पोस्टमध्ये नेमकं काय लिहिले आहे?
युजरने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये त्याची पत्नी ट्रेनच्या दरवाजाजवळ डोके टेकवून झोपलेली दिसत आहे. तिच्या जवळच काही लोक उभे आहेत. हे चित्र पाहून युजर्स रेल्वेच्या जागतिक दर्जाच्या सुविधांवर प्रश्न उपस्थित करत आहेत. या फोटोसह कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, धन्यवाद! रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव जी, तुमच्यामुळे आज माझ्या पत्नीला ट्रेनमध्ये ही जागतिक दर्जाची सुविधा मिळत आहे, मी सदैव तुमचा ऋणी राहीन.
युजरने रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना टॅग केलेल्या या पोस्टवर लोक आता भरभरून कमेंट करत आहेत. दरम्यान, या पोस्टवर रेल्वेकडूनही प्रतिक्रिया देण्यात आली. रेल्वे प्रशासनाने त्या युजरकडे संबंधित ट्रेनच्या तिकिटाची माहिती मागितली. मात्र, युजरने त्यावर कोणताही प्रतिसाद दिला नाही. अनेकांनी त्या व्यक्तीचे समर्थन केले तर काहींनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली.
हेही वाचा – VIDEO : माकड थेट छतावरून पडले अन् अलिशान कारचे सनरूफ तुटले, यानंतर जे काही केलं ते पाहून व्हाल अवाक्
u
ट्रेनमधील हा फोटो @Chaotic_mind99 या एक्स अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर एका युजरने लिहिले आहे की, “ब्लू टिकसाठी पैसे आहेत, पण बायकोसाठी तिकीट बुक करण्यासाठी नाहीत.” एकाने लिहिले, “भाऊ, तिकीट चार महिने अगोदर बुक केल्या जातात, तुम्ही ते आधी करायला हवे होते, आता शिव्या देण्यात काय फायदा आहे.” दुसऱ्याने लिहिले की, “ती खरोखरच तुझी बायको आहे की, केवळ प्रपोगंडासाठी केलं आहेस?” तिसऱ्याने लिहिले की, “हा फ्रॉड आहे, कारण रेल्वेने त्याच्याकडे तीन वेळा पीएनआर किंवा ट्रेन नंबर मागितला आहे, परंतु उत्तर मिळाले नाही; त्याच्याकडे पत्नीचा दुसरा फोटोही नाही.”
अनेक वापरकर्त्यांचे म्हणणे आहे की, ट्रेनमधील ही एक सामान्य समस्या आहे. लोकांना बसण्यासाठी सीट्स मिळत नाहीत. असंही शक्य आहे की, त्या व्यक्तीला आपत्कालीन परिस्थितीत आपल्या पत्नीला घेऊन कुठेतरी जावे लागले असेल, त्याने तिकीट काढले असेल पण ते कन्फर्म झाले नाही आणि त्याला मजबुरीने असा प्रवासा करावा लागला असेल, पण या घटनेवर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून कळवा.