Indian Railway Viral Post : सणासुदीच्या काळात ट्रेनमध्ये कन्फर्म सीट मिळणं फार अवघड असतं. कारण या काळात लाखो लोक ट्रेनने प्रवास करतात. अशावेळी कन्फर्म तिकीट मिळणे तर दूरच, ट्रेनमध्ये पाय ठेवायला जागा शिल्लक नसते. अनेकदा लोक ट्रेनच्या टॉयलेटमध्ये बसून तर कधी खिडकी आणि दरवाजाला लटकून प्रवास करतात. सणाच्या दिवशी घरी पोहोचण्यासाठी प्रवासी जीवाची पर्वा न करता असा जीवघेणा प्रवास करतात, ज्याचे अनेक व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशातच एका युजरने रेल्वे प्रवासादरम्यानचे एक भीषण वास्तव समोर आणले आहे. युजरने ट्रेनच्या टॉयलेट आणि दरवाजाच्या मधील जागेत बसलेल्या त्याच्या बायकोचा फोटो पोस्ट केला आहे. ही पोस्ट त्याने केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना टॅग केली. दरम्यान, ही पोस्ट आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेक जण त्यावर तीव्र संताप व्यक्त करत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा