Indian Railway Viral Video : देशभरात लाखो लोक रोज ट्रेनने प्रवास करतात. या प्रवासादरम्यान प्रवाशांना वारंवार सावधान राहण्यासंबंधीच्या सूचना दिल्या जातात. पण, प्रवासी त्याकडे दुर्लक्ष करतात आणि मग कित्येकदा त्यांना मोठ्या नुकसानीला तोंड द्यावे लागते. सध्या ट्रेनमधील अशाच एका घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून अनेकांना धक्काच बसला आहे. तुम्ही ट्रेनमध्ये विकण्यासाठी येणाऱ्या अनेक वस्तू स्वस्त म्हणून विकत घेता; पण त्या विकत घेताना तुमचे या व्हिडीओतील प्रवाशाप्रमाणे मोठे आर्थिक नुकसानही होऊ शकते. नेमकं प्रवाशाबरोबर काय घडलं ते जाणून घेऊ…

ट्रेनमधून प्रवास करताना तुमच्याबरोबरही घडू शकते ‘अशी’ घटना

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक प्रवासी ट्रेनच्या इमर्जन्सी विंडोजवळच्या सीटवर बसला आहे आणि रेल्वे प्लॅटफॉर्मवर एक विक्रेता उभा आहे; जो या प्रवाशाला पॉवर बँक विकतोय. प्रवासी सीटवर बसून आरामात पॉवर बँक नीट बघतो. त्यानंतर तिची किंमत ठरवतो. विक्रेता दोन पॉवर बँक त्याला ६०० रुपयांना देणार असल्याचे सांगतो; पण प्रवासी त्याला ५०० पर्यंत देण्याची विनंती करतो. त्यानंतर प्रवासी विक्रेत्याला ५०० रुपये देण्यासाठी पॉकेट काढतो आणि त्याची फसवणूक होते. प्लॅटफॉर्मवर उभा असलेला विक्रेता योग्य संधीची वाट बघतो आणि संधी मिळताच प्रवाशाच्या हातातून पॉकेट हिसकावून पळून जातो. यावेळी प्रवासी हातातील वस्तू तशाच घेऊन त्याला पकडण्यासाठी धावतो; पण शेवटी तो चोर काही त्याला सापडत नाही. ही घटना लक्षात घेऊन, ट्रेनमधून प्रवास करताना अनोळख्या व्यक्तींसमोर पाकीट काढल्यावर चुकूनही बेसावध राहू नका; अन्यथा तुमचीही अशी फसवणूक होऊ शकते.

Chinese tourist fell down from train
‘सेल्फी’साठी तरुणी ट्रेन बाहेर डोकावताच झाडाला आदळली अन्…; पुढे जे झालं ते चमत्कारापेक्षा कमी नाही, पाहा अपघाताचा थरारक VIDEO
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Female Chinese Tourist Miraculously Survives After Falling From Running Train In Colombo Chilling Videos
धावत्या रेल्वेच्या दरवाज्यात उभी होती तरुणी, अचानक पाय सटकला अन्…. थरारक घटनेचा Video Viral
demand for ransom of Rs 2 crore case filed against three including Valmik Karad in kej
दोन कोटींच्या खंडणीची मागणी; वाल्मीक कराडांसह तिघांवर केजमध्ये गुन्हा
confusion among passengers after badlapur local departing from thane replaced with csmt local train
ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांचा गोंधळ; अचानक मुंबई दिशेकडे जाणारी लोकल लावल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम
mankhurd subways in pathetic condition waiting for repairs
मानखुर्दमधील भुयारी मार्ग डागडुजीच्या प्रतीक्षेत
Indian Railways Shocking Video
ट्रेनमध्ये ‘ही’ सीट चुकूनही कोणालाही मिळू नये, तिकीट असूनही प्रवाशाला सहन करावा लागतोय त्रास; Video पाहून संतापले लोक
indian railways shocking video
रेल्वे रुळांच्या मधोमध झोपला, वरून गेली भरधाव ट्रेन अन् नंतर घडलं असं की…; Video पाहून व्हाल शॉक

ट्रेनमधील प्रवाश्याला पॉवर बँक विकण्याच्या बहाण्याने पॉकेट हिसकावलं अन्…

हेही वाचा – दोन ट्रेन समोरासमोर धडकल्या! रेल्वेचा एक डबा थेट दुसऱ्या डब्यावर चढला, अनेक प्रवासी गंभीर जखमी? अपघाताच्या घटनेचा थरारक Video? वाचा, सत्य घटना

सावध राहा, सतर्क राहा, रेल्वे प्रवाशांना युजरचे आवाहन

ट्रेनमधील फसवणुकीचा हा व्हिडीओ @MohiniWealth नावाच्या एक्स अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर लोक वेगवेगळ्य प्रकारच्या कमेंट्स करीत आहेत. एका युजरने कमेंट करीत लिहिलेय की, सावध राहा, सतर्क राहा. कारण- अशा फसवणुकीच्या घटना खूप होतात. दुसऱ्या युजरने लिहिलेय की, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आम्ही खूप सावध झालो आहोत. तिसऱ्या युजरने लिहिलेय की, चोर हुशार असो वा नसो; ग्राहक नक्कीच मूर्ख होता. शेवटी एकाने लिहिलेय की, हा व्हिडीओ स्क्रिप्टेड असला तरी ट्रेनमध्ये प्रवाशांनी सावध राहिले पाहिजे.

Story img Loader