Indian Railway Viral Video : सणासुदीच्या काळात ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी, रेल्वेस्थानकांवर हाणामारी, असे भयावह चित्र दिसते. अनेक जण तर ट्रेनच्या दरवाजात बसून किंवा लटकत, तर कधी उभं राहायलाही जागा नसल्यास टॉयलेटमध्ये बसून प्रवास करतात. अनेकदा यामुळे अपघाताच्याही दुर्घटना घडतात. पण, तरीही लोकांना भीती वाटत नाही. आपला जीव धोक्यात घालताना कोणताही विचार ते करीत नाहीत. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहताना तुमच्याही काळजात धडकी भरल्याशिवाय राहणार नाही. अनेकांनी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर, आपल्या लहान बाळाचा जीव धोक्यात घालण्याइतपत कोण बेफिकीर असतं? विशेष म्हणजे जन्मदात्री आई एवढी मोठी रिक्स घेऊच कशी शकते, असा संतप्त सवाल उपस्थित करीत आहेत.

लहान बाळाला घेऊन ट्रेनमध्ये चढण्यासाठी आईची धडपड

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक लांब पल्ल्याची ट्रेन रेल्वे प्लॅटफॉर्मवर उभी आहे. यावेळी ट्रेनमध्ये दरवाजाने चढण्यासाठी प्रचंड गर्दी असल्याने एक महिला प्लॅटफॉर्मच्या विरुद्ध बाजूने आपल्या नवजात बाळाला घेऊन ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करीत आहे. महिलेसह आणखी तीन लोक आहेत. ट्रेनच्या आतून एक जण ट्रेनमध्ये येण्यासाठी तिला मदत करीत आहे आणि इतर दोघे तिला रुळांवरून ट्रेनमध्ये चढण्यास मदत करीत आहेत. यावेळी ती महिला हातात बाळा घेऊन येते. तेव्हा रुळांवर उभे असलेले दोघे महिलेची बॅग आणि बाळाला पकडतात. यानंतर ती महिला ट्रेनमध्ये चढते आणि सर्वप्रथम बॅग घेते. नंतर बाळ घेते. बाळाला आईच्या हातात देताक्षणीच ट्रेन सुरू होते. यावेळी क्षणभराचा जरी उशीर झाला असता, तर बाळाबरोबर मोठी अघडित घटना घडू शकली असती. या धक्कादायक व्हिडीओवर लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. कोणती आई इतका धोका पत्करून ट्रेनमध्ये चढू शकते, असा प्रश्न आता लोक उपस्थित करत आहेत.

Viral video of a fight between some local train passengers on a kandivali railway station is currently going viral on social media
कहरच! तरुणांनी मुंबईतील कांदिवली रेल्वे स्टेशनवर हद्दच पार केली; VIDEO पाहून तुम्हीच सांगा हे कितपत योग्य?
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
a young girl dance on a electric pole
जीवापेक्षा रील महत्त्वाची का? विजेच्या खांबावर चढून तरुणीने केला डान्स; Video होतोय व्हायरल
Pune Accident
Pune Accident : “अचानक डंपरचा मोठा आवाज आला, आम्ही जागेवरुन उठून पुढे जाईपर्यंत…”, प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं?
train shocking video indian vlogger man lying on the roof of a moving train
ट्रेनमधील सीटसाठीची भांडणं बघितली, पण हा काय प्रकार; छतावर झोपला अन्…, पाहा धक्कादायक VIDEO
Mumbaikars saved the young man's life while overhead wire accident shocking video goes viral
याला म्हणतात खरे मुंबईकर! तरुण ओव्‍हरहेड वायरला चिकटला; प्रवाशांनी कसं वाचवलं पाहा; थरारक VIDEO व्हायरल
Mumbai local shocking incident central railway AC train one person boarded naked in women compartment shocking video goes viral
आता तर हद्दच झाली! मुंबई लोकलच्या महिला डब्यात नग्नावस्थेत चढला मनोरुग्ण; किंकाळ्या आरडा ओरड अन्…धक्कादायक VIDEO व्हायरल
woman risked her life to make a reel on train track shocking video goes viral
तरुणी रेल्वे रुळावर रील बनवण्यात मग्न, ट्रेन आल्याचंही भान राहिलं नाही अन्…; VIDEO चा शेवट पाहून तुम्हालाही येईल संताप

हेही वाचा – सरपंचाचं लफडं बायकोनं पकडलं; नवऱ्याबरोबर कारमधून फिरणाऱ्या गर्लफ्रेंडची केली अशी अवस्था की…; VIDEO झाला व्हायरल

लोक काळाबरोबर बुद्धीदेखील गमावून बसलेत”, व्हिडीओ पाहून युजरचा संताप

या व्हिडीओवर लोकांनी तीव्र रोष व्यक्त करत त्या आईच्या बेफिकीरपणाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. ट्रेनच्या जीवघेण्या प्रवासाचा हा व्हिडीओ @lumafact नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर लोकही वेगवेगळ्या कमेंट्स करीत आहेत. एका युजरने लिहिले, “लोक काळाबरोबर बुद्धीदेखील गमावून बसले आहे.” दुसऱ्याने लिहिले, “त्यांच्यासाठी मूल शेवटचे येते.” तिसऱ्याने लिहिले, “बॅग आधी दिली आणि नंतर बाळ दिले, हे फार धक्कादायक होते.” आणखी एका युजरने सवाल केला की, जन्मदाती आई बाळाबाबत एवढी मोठी रिक्स घेऊच कशी शकते?”.

Story img Loader