Indian Railway Viral Video : भारतीय रेल्वेने दररोज करोडो लोक प्रवास करतात. त्यामुळे ट्रेनमधून प्रवास करताना तुमच्याकडे आरक्षित तिकीट असो किंवा नसो; तुम्हाला सुरुवातीला आरक्षित तिकीट मिळविण्यासाठी, त्यानंतर ट्रेनमध्ये चढण्यासाठी आणि चढल्यानंतर भांडून आपली आरक्षित सीट मिळविण्यासाठी, असा संघर्ष तुम्हाला करावाच लागतो. कारण- अनेक विनातिकीट प्रवासी आरक्षित डब्यामध्ये घुसतात आणि आसनासाठी आरक्षित तिकीट असणाऱ्या प्रवाशांबरोबर वाद घालू लागतात. अनेकदा आसन मिळवण्यासाठी वाद-विवाद, हाणामारीच्या घटनादेखील घडतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात एक प्रवासी विनातिकीट प्रवास करताना टीटीईला माज दाखवतोय; पण पुढच्या क्षणी टीटीई त्याचा माज उतरवतो.

टीटीईने विनातिकीट प्रवाशाला शिकवला धडा

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ बिहारमधील समस्तीपूरमधील असल्याचे सांगितले जात आहे. त्यात ट्रेनमध्ये एक टीटीई एका तिकीट नसलेल्या प्रवाशाला पकडतो. हा प्रवासी आरक्षित डब्यामध्ये तिकीट असलेल्या प्रवाशाला विनाकारण त्रास देत होता. यावेळी टीटीई दोघांचे मत ऐकून घेतो. नंतर विनातिकीट प्रवाशाला तो असा काही धडा शिकवतो की, तो आयुष्यात कधीही तिकिटाशिवाय प्रवास करणार नाही.

व्हिडीओमध्ये विनातिकीट प्रवास करणारा प्रवासी टीटीईच्या मागे-पुढे करताना दिसत आहे. तो प्रवासी टीटीईला पाहताच सीटची मागणी करू लागतो. नंतर तो त्याच्याकडे तिकिटाची मागणी करू लागतो. त्यावर टीटीई त्याला तिकीट आहे का, अशी विचारणा करतो. त्यावर तो माझ्याकडे तिकीट नाही, असे म्हणतो. हे ऐकताच टीटीई भडकतो आणि त्याला म्हणतो की, तुझ्याकडे तिकीट नाही; मग तू कशाला एवढा माज दाखवतोस.

विना तिकीट प्रवाश्याने टीटीईच्या खांद्यावर ठेवला हात अन्…

त्यावर विनातिकीट प्रवासी म्हणतो की, मी डीआरएमचा भाचा आहे. थांबा, मी कॉल करतो त्याला. त्यावर टीटीईने त्याला हां त्याच्याबरोबर बोलणं करून दे, असं म्हणतो. यावेळी प्रवासी टीटीईच्या खांद्यावर हात ठेवून बोलत असतो. हे पाहून टीटीई पुन्हा संतापतो आणि म्हणतो की, तोंडाने बोल. अंगाला हात लावू नकोस. त्यानंतर टीटीई त्याला घेऊन जातो.

लग्नासाठी मुलगी बघायला जाताय, मग काकांचा भन्नाट फॉर्म्युला एकदा ऐकाच; VIDEO पाहून तुम्ही पोट धरून हसाल

हा व्हिडीओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटद्वारे शेअर करण्यात आला आहे; ज्यावर युजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले, “अशा लोकांबरोबर असेच व्हायला हवे.” दुसऱ्याने लिहिले, “तो सेकंड एसीमध्ये विनातिकीट प्रवास करत आहे… या माणसाचा आत्मविश्वास कमालीचा आहे.”

Story img Loader