काहीवेळा लोक घाईगडबडीत अशा चुका करतात की ज्याचा त्यांना नंतर पश्चाताप होतो. पण रेल्वे क्रॉसिंगजवळ अशाप्रकारची घाई अनेकदा जीवघेणी ठरु शकते. रेल्वे क्रॉसिंगवर ट्रेन गेल्यावर फाटक उघडतो आणि त्यानंतर लोक रुळ ओलांडतात. पण काही लोक असे आहेत जे घाईघाईत बंद रेल्वे फाटकही क्रॉस करण्याचा प्रयत्न करतात. पण अशाप्रकारे बंद रेल्वे फाटक ओलांडणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखे आहे. मात्र काही लोक त्याकडे दुर्लक्ष करत फाटक ओलांडू लागतात. असाच एक धोकादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक अल्टो कार भरधाव वेगाने येते आणि बंद रेल्वे क्रॉसिंग तोडून खालून निघून जाते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अल्टो कारने घाईगडबडीत तोडले रेल्वे फाटक

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, एक अल्टो कार रेल्वे क्रॉसिंगवर भरधाव वेगाने येते आणि फाटक बंद असल्याचे पाहिल्यावर तो तोडण्याचा प्रयत्न करते. धक्कादायक बाब म्हणजे कार फाटकाच्या पलीकडे पोहोचताच मागून एक ट्रेन सुसाट वेगाने जाते. यावेळी कार चालवणारा चालक कसलीही भीती न बाळगता फाटकातून बाहेर निघण्यासाठी गेटवर जोरदारत धडक देतो. असे दोन-तीन वेळा धडक दिल्यावर तो गेटवर करतो आणि नंतर खालून सुसाट वेगाने निघून जातो. यादरम्यान एक व्यक्ती मागून येतो आणि त्याच्या मोबाईलवर वाहनाच्या नंबर प्लेटचा फोटो क्लिक करतो.

@Bihar_se_hai नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, एवढी घाई करणारे पान शॉपवर थांबतात. या व्हिडिओला आतापर्यंत ९० हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर अनेकांनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, तो एक गुंडा आहे जो गुन्हा केल्यानंतर पळून गेला आहे. दुसऱ्या युजरने लिहिले की, रेल्वे कायद्याचे कलम १६० लागू केले जाईल, कारण हा अजामीनपात्र गुन्हा आहे. यावर तिसऱ्या युजरने गमतीत लिहिले की, “त्याने आपल्या भाओजीची गाडी आणली असावी.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian railways alto car broke the railway crossing came out from below driver stunt video sjr