Indian Railway Cleaning Video : भारतीय रेल्वेला जीवनवाहिनी, असे म्हटले जाते. दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. अतिशय आरामदायी आणि स्वस्त प्रवासासाठी रेल्वेचा पर्याय निवडला जातो. विशेषत: लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी मोठ्या संख्येने लोक ट्रेनला प्राधान्य देतात. त्यात भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतही अनेकांचे जीवन लोकल ट्रेनवर अवलंबून आहे. ट्रेनचे वेळापत्रक चुकले, तर मुंबईकरांचे दिवसांचे गणित बिघडते. त्यामुळे आज लाखो मुंबईकर लोक ट्रेनच्या वेळापत्रकानुसार आपले दिवसाचे वेळापत्रक ठरवतात. पण, रोज तुम्ही ज्या ट्रेनने प्रवास करता ती ट्रेन नेमकी कशा पद्धतीने स्वच्छ केली जाते, हे तुम्हाला माहितेय का? नसेल तर बातमीतील व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पाहा.

ऑटोमॅटिक कोच वॉशिंग प्लांट नेमंक आहे तरी काय?

भारतीय रेल्वेवर आज अनेकांचे रोजचे जीवन अवलंबून आहे. एक दिवस जरी ट्रेन सेवा ठप्प झाली तरी अनेकांचे आर्थिक गणित बिघडते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून सातत्याने प्रवाशांचा प्रवास जलद आणि सुखकर व्हावा यासाठी प्रयत्न केले जातात. पण रोज जमा होणारी धूळ, माती आणि प्रवाशांमुळे रेल्वेगाड्या खूप अस्वच्छ दिसू लागतात. याच रेल्वेगाड्यांना स्वच्छ करण्यासाठी विशेष तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. या तंत्रज्ञानाला ऑटोमॅटिक कोच वॉशिंग प्लांट, असे म्हटले जाते. अनेक ट्रेन यार्डमध्ये तुम्हाला हा प्लांट पाहायला मिळेल. यात अगदी काही मिनिटांत आणि कमी पाण्याद्वारे ट्रेन स्वच्छ अन् चकाचक केली जाते.

२० डब्यांची ट्रेन केवळ आठ मिनिटांत चकाचक

या तंत्रज्ञानात माणसाची गरज लागत नाही. संपूर्ण ट्रेन फक्त मशीनने साफ केली जाते. सोशल मीडियावर ट्रेनची स्वच्छता कशा प्रकारे केली जाते याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात तुम्हाला बाहेरून अस्वच्छ झालेली ट्रेन तंत्रज्ञानाच्या मदतीने स्वच्छ करण्यात येत असल्याचे दिसत आहे. अंतिम स्थानकावर पोहोचल्यानंतर लोको पायलट ट्रेन रेल्वे यार्डात घेऊन जातो. त्यानंतर आधुनिक पद्धतींचा वापर करून ट्रेनची स्वच्छता केली जाते.

अशाप्रकारे होते ट्रेनची स्वच्छता

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, ट्रेनच्या दोन्ही बाजूंनी चार मोठे मोठे ब्रश आणि प्रेशरने पाणी येण्यासाठी पंप लावण्यात आले आहेत. यावेळी प्रथम ट्रेन स्वच्छ करण्यासाठी वॉशिंग प्लांटवर आणून उभी केली जाते. त्यानंतर एकेका कोचवर रसायन टाकून दोन्ही बाजूंनी लावलेल्या मोठ्या ब्रशच्या साह्याने ट्रेनवर जमा झालेली धूळ, माती आधी स्वच्छ केली जाते आणि त्यानंतर पुढे उभ्या पाईपच्या माध्यमातून प्रेशरने पाणी सोडून ट्रेन धुतली जाते. अशा प्रकारे अवघ्या सात ते आठ मिनिटांत ट्रेनचे सर्व डबे बाहेरून स्वच्छ केले जातात.

हेही वाचा – खांबावर लटकलेल्या अजगराने हवेत कावळ्यावर घातली झडप; जबड्यात मुंडक पकडलं अन्…; पाहा थरकाप उडवणारा VIDEO

तुम्ही व्हिडीओत पाहिले असेल की, ट्रेन अगदी संथ गतीने धावत आहे, यावेळी ऑटोमॅटिक क्लिनिंग प्लांटद्वारे सफाई सुरू आहे. या कामासाठी कोणत्याही व्यक्तीची गरज लागत नाही. या प्लांटच्या मदतीने ट्रेनचे सर्व कोच बाहेरुन जवळपास १५ मिनिटांत साफ केले जातात. इतकेच नाही, तर ट्रेनच्या टॉयलेटच्या खालचा भागही स्वच्छ करून संसर्गमुक्त केला जातो. हा व्हिडीओ एक्सवर @HowThingsWork नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.

सामान्य धुलाईच्या तुलनेत ऑटोमॅटिक कोच वॉशिंग प्लांटच्या माध्यमातून फक्त २० टक्के पाण्याचा वापर करून ट्रेन स्वच्छ केली जाते. आश्चर्यकारक बाब म्हणजे ज्या २० टक्के पाण्याने ट्रेन धुतली, त्यातील ८० टक्के पाणी पुन्हा वापरता येते. त्यासाठी या प्लांटमध्ये पाणी स्वच्छ करण्याचीही व्यवस्था आहे. या प्लांटमुळे ट्रेन स्वच्छ करताना वेळ आणि पाणी अशा दोन्हीची बचत होते. ट्रेन प्लांटमध्ये येऊन उभी राहताच पहिल्यांदा त्यावर रसायनाची फवारणी केली जाते. त्यानंतर प्लांटवरील मोठमोठे ब्रश पाण्याचा वापर करीत ट्रेनचा एकेक कोच बाहेरून साफ करतात. या प्लांटमध्ये कोणतीही कोणतीही मानवी मदत घेतली जात नाही विशेष म्हणजे ट्रेन स्वच्छ करण्यासाठी ट्रेनवर थंड आणि गरम पाण्याचा हाय प्रेशर हादेखील मॅन्युअलची होत असतो.