Indian Railways New coach Viral Video: देशात सर्वाधिक सर्वसामान्य नागरिक हे रेल्वेने प्रवास करतात. देशभरात रेल्वेचं मोठं जाळं आहे. आशियातली सर्वांत मोठी आणि जगातली चौथी सर्वांत मोठी रेल्वे म्हणून भारतीय रेल्वेकडे पाहिलं जातं. भारतातील जास्तीत जास्त लोक रेल्वेनं प्रवास करणं पसंत करतात. प्रवाशांना रेल्वेनं प्रवास करणं सुरक्षित, सोईचं व परवडणारं वाटतं. रेल्वेनं प्रवास करायला बहुतेक जणांना आवडतं. ट्रेनमध्ये कंटाळा आला, असं म्हणणारा क्वचितच कोणी असेल. बऱ्याचदा रेल्वेतील कधी भांडणाचे, हाणामारीचे अशा अनेकविध प्रकारच्या घटनांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. आता पुन्हा एकदा रेल्वेतील एक व्हिडीओ समोर आला आहे. पण, हा व्हिडीओ पाहून नेटकरी शाबासकी देत आहेत. नेमकं प्रकरण काय आहे ते जाणून घ्या…
रेल्वेच्या व्हायरल व्हिडीओमध्ये नेमके काय दाखवण्यात आले आहे?
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओंमध्ये ट्रेनचे काही डबे रेल्वे ट्रॅकवर उभे असल्याचे दिसून येत आहेत. ते आता वापरात नसतील म्हणून काही लोकांनी त्यात काही बदल केले; जेणेकरून ते त्यात राहू शकतील. व्हिडीओमध्ये ट्रेनचा डबा आतून कसा दिसतो हे पाहून सर्व नेटकरी आश्चर्यचकित झाले आहेत. हा डबा पाहून तुम्हालाही वाटणार नाही की, तुम्ही हे सर्व रेल्वेतील दृश्य पाहत आहात. रेल्वेचा कोच अगदी खोलीसारखा बनवला आहे. या कोचला फार सुशोभित करण्यात आले आहे. आत सर्वत्र लाईट, एसी व बेड आहेत. या कोचमध्ये बरेच लोक राहताना दिसत आहेत. ज्यानेही कोचमध्ये असे बदल केले आहेत, त्यांनी खूप चांगले काम केले आहे, असे नेटकरी म्हणत असून त्या लोकांच्या कामाचे कौतुक करीत आहे…आणि हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण दुसऱ्या बाजुने पाहता रेल्वेच्या सौंदर्यांच्या दृष्टीने हे काम चांगल असलं तरी रेल्वे सार्वजनिक मालमत्ता आहे. त्यामुळे वैयक्तिक वापरासाठी हे बेकायदा आहे.
येथे पाहा व्हिडीओ
तुम्ही आताच पाहिलेला व्हिडीओ X प्लॅटफॉर्मवर @VishalMalvi_ नावाच्या अकाउंटने पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले होते, ‘भारतीय ट्रेन नाही, तर पंचतारांकित हॉटेल.’ बातमी लिहेपर्यंत, हा व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर एका वापरकर्त्याने कमेंट केली आणि लिहिले, “हे खूप चांगले बनवले आहे.” अनेक नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ पाहून भरभरून कौतुक केले आहे.