Indian Railway Viral Video : भारतीय रेल्वेचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी गर्दीने खचाखच भरलेल्या ट्रेन्स, तर कधी विनातिकीट प्रवाशांच्या गर्दीचे व्हिडीओ अनेकदा पाहायला मिळतात. अशात भारतीय रेल्वेचा एक नवा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधील रेल्वेची स्थिती पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

या व्हिडीओमध्ये ट्रेन प्लॅटफॉर्मवरून सुटताना दिसतेय. मात्र, तरीही काही तरुण चालत्या ट्रेनमध्ये चढताना; तर काही जण ट्रेनच्या दरवाजाला लटकून प्रवास करताना दिसत आहेत, इतकेच नव्हे, तर ट्रेनच्या छत आणि जॉइंट्सवरही काही तरुण चढताना दिसत आहेत. त्याशिवाय ट्रेनच्या छतावर आधीच डझनभर तरुण बसून प्रवास करीत आहेत. हा व्हिडीओ चित्रित करणाऱ्या व्यक्तीने हे प्रकरण जुन्या दिल्ली रेल्वेस्थानकाशी संबंधित असल्याचा दावा केला आहे. या व्हिडीओनंतर अनेक सोशल मीडिया युजर्स रेल्वेच्या व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करीत आहेत.

हार्दिक पंड्याच्या ‘त्या’ फोटोसह आनंद महिंद्रांची खास पोस्ट, म्हणाले, ‘आयुष्यात तुम्ही धक्के खाल, पडाल पण….’

या धक्कादायक व्हिडीओमध्ये रेल्वेस्थानकामधून ट्रेन जात असल्याचे दिसून येत आहे. प्लॅटफॉर्मवर उपस्थित असलेली व्यक्ती चालत्या ट्रेनच्या छतावर चढणाऱ्या, दाराला लटकणाऱ्या आणि ट्रेनच्या डब्याच्या जॉइंट्सवर बसलेल्या प्रवाशांना, “मित्रांनो मरू शकता…”, असे मोठ्याने म्हणताना दिसतेय.

हा व्हिडीओ @IndianTechGuide नावाच्या एक्स अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय की, दिल्ली रेल्वेस्थानकाच्या स्थितीदरम्यान शेकडो युजर्स रेल्वेच्या या व्हिडीओवर कमेंट्स करीत आहेत. एका युजरने लिहिले की, ही समस्या गंभीर आहे. दुसऱ्या एका युजरने, स्लिपर कोचची संख्या वाढवायला हवी, असे म्हटले आहे. तर काहींनी प्रवाशांची सुरक्षा आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यावर प्रश्न उपस्थित केले आहेत.