Indian Railway : भारतीय रेल्वेला देशाची जीवनवाहिनी म्हटले जाते. साधरणपणे लोकांना लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी ट्रेन सोयीची वाटते. यातही प्रवाशांना एसी बर्थमधून प्रवास करणे अधिक सोयीचे जाते कारण त्यात अनेक सेवा-सुविधा पुरवल्या जातात. याच एसी कोचमध्ये प्रवाशांनन दोन बेडशीट, एक उशी त्याचे कव्हर, एक टॉवेल आणि एक ब्लँकेट दिली जाते. पण ते मोफत नाही, तर त्याचे शुल्क तिकीटमधून घेतले जाते.
पण या ट्रेनमधील ब्लँकेट्स आणि चादरी किती दिवसांनी धुतले जातात किंवा स्वच्छ केले जातात हे तुम्हाला माहिती आहे का? नसेल तर एका आरटीआयच्या उत्तरात रेल्वेकडून याबाबत उत्तर देण्यात आले आहे.
रेल्वेच्या एसी कोचमध्ये बेड रोलची सोय आहे. ट्रेनमध्ये दिलेल्या बेड रोलमध्ये एक ब्लँकेट आणि चादरींचे पॅकेट असते. या पॅकेटमध्ये दोन स्वच्छ बेडशीट, एक टॉवेल आणि एक उशाचे कव्हर आणि उशी असते. यासाठी रेल्वे कोणतेही वेगळे शुल्क आकारत नाही. त्याचे शुल्क तिकीट भाड्यात समाविष्ट असते. फक्त गरीब रथ आणि दुरांतोमध्ये यासाठी वेगळे शुल्क आकारले जाते.
ट्रेनच्या एसी कोचमधील चादरी आणि ब्लँकेट महिन्यातून किती वेळा धुतात?
रेल्वेच्या नियमांनुसार, बेडशीट आणि टॉवेलसह उशीचे कव्हर एकदा वापरल्यानंतर धुतले जातात. या बेडशीट धुण्यासाठी, रेल्वेने देशभरात ४६ विभागीय लॉन्ड्री तयार केल्या आहेत. याचबरबर BOOT फॉर्म्युलावर २५ लाँड्रीही बांधल्या आहेत.
पण बेडरोलसह दिलेले ब्लँकेट महिन्यातून एकदा स्वच्छ केले जातात. ब्लँकेट ओले झाले, एखाद्या प्रवाशाने त्यावर उलट्या केल्या असतील किंवा त्यावर काही पडले असेल, दुर्गंधी येत असेल तर ते नियोजित वेळेपूर्वीच धुतले जाते. अन्यथा ब्लँकेट महिन्यातून एकदाच धुतात. रेल्वेने पुरविल्या जाणाऱ्या लोकरीच्या ब्लँकेटची देखभाल करणे खूपच अवघड काम असते. त्यामुळे प्रवाशांची ब्लँकेटबाबत अनेकदा तक्रार असते.
काही रेल्वे कर्मचाऱ्यांचे असे मत आहे की, काही वेळा ब्लँकेट धुण्यास दोन महिन्यांपर्यंतचा कालावधी लागतो. रेल्वेने विभागीय लॉन्ड्री बांधली असली तरी ती चालवायला कंत्राटदाराला दिली आहे. कंत्राटदारांच्या मनमानीमुळे साफसफाई योग्य प्रकारे होत नाही, त्यामुळे अनेकदा कोचमधील बेडरोलच्या तक्रारी येतात. गेल्या वर्षी रेल्वेने या लॉन्ड्रीच्या कंत्राट नियमात बदल केला. यापूर्वी हे कंत्राट दीर्घ कालावधीसाठी दिले जात होते, परंतु नंतर ते कमी करून ६ महिन्यांचे करण्यात आले.