Passenger Finds Insect In Food On Kashi Express : आरामदायी प्रवासासाठी अनेक प्रवासी भारतीय रेल्वेला प्राधान्य देतात. स्वस्तात मस्त प्रवासासाठी लोक ट्रेनने प्रवास करतात. यात प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनही विविध सेवा-सुविधा देत असते. मात्र, काहीवेळा प्रवाशांना ट्रेनमधील निकृष्ट सेवा-सुविधांमुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. यात गेल्या काही महिन्यांपासून रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणाची प्रकरणं वाढताना दिसतायत. विशेषत: अन्नपदार्थांबाबतीत रेल्वे प्रवाशांच्या जीवाशी खेळत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. नुकतंच काशी एक्स्प्रेसच्या बाबतीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गोरखपूरहून मुंबईला जाणाऱ्या काशी एक्स्प्रेसमधील एक प्रवाशाबरोबर असे काही घडले, जो तो कधीच विसरणार नाही. या घटनेचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काशी एक्स्प्रेसमधून परवेझ हाश्मी नावाचा प्रवासी प्रवास करत होता. यावेळी त्याने ट्रेनमध्ये दिले जाणारे फूड पॅकेट उघडले, ज्यात त्याला चक्क एक मोठा किडा आढळून आला, ज्याचा फोटो परवेझने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केला आहे. तसेच हा फोटो त्याने केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनाही टॅग केला आहे. ही घटना १३ मे रोजी घडली आहे. दरम्यान, अनेकांनी या घटनेनंतर भारतीय रेल्वेच्या अन्नपदार्थांच्या निकृष्ट दर्जाबाबत टिपण्णी केली आहे. काशी एक्स्प्रेसमधील कॅटरिंग विभागाच्या निष्काळजीपणामुळे सोशल मीडियावर युजर्स प्रचंड संतापलेले दिसत आहेत.

तत्काळ तिकीट बुकिंगचं टेन्शन सोडा! कन्फर्म सीट मिळवण्यासाठी करा फक्त ‘हे’ एक काम

काशी एक्स्प्रेसमधील फूड पॅकेटचा फोटो पोस्ट करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, अश्विनी वैष्णवजी, ट्रेन क्रमांक 15018 काशी एक्स्प्रेसच्या जेवणात एक किडा सापडला आहे. १३ मे रोजी शेअर केलेल्या या फोटोला आतापर्यंत सात लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. युजर्स या फोटोवर जोरदार कमेंट करताना दिसत आहेत. यावर बहुतांश लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. अनेक वापरकर्त्यांनी लिहिले आहे की, रेल्वे तिकिटांसाठी चांगली रक्कम आकारते, पण तरीही अशा निकृष्ट सुविधा पुरवतात. मात्र, यावर रेल्वे सेवेनेही उत्तर दिले आहे. संबंधित प्रकारानंतर प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

रेल्वे सेवेने लिहिले आहे की, सर, कृपया तुमचा पीएनआर आणि मोबाइल नंबर डायरेक्ट मेसेजमध्ये पाठवा. मात्र, या घटनेतून काशी एक्स्प्रेसच्या कॅटरिंग विभागाकडून झालेला निष्काळजीपणा स्पष्टपणे दिसतोय. यापूर्वीही अनेकदा अशा घटना समोर आल्या आहेत. मात्र त्यानंतरही रेल्वे प्रशासन त्याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे अनेकांचे मत आहे.