Thane Railway Station CCTV Cammera Video : सुरक्षेच्या दृष्टीने आता प्रत्येक रेल्वेस्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून रेल्वेस्थानकावरील प्रत्येक हालचालींवर नजर ठेवली जाते. याशिवाय चोरी, अपघाताच्या घटनांचा या सीसीटीव्ही कॅमेरामधील रेकॉर्ड व्हिडीओच्या माध्यमातून तपास केला जातो. रेल्वे स्ठानकावरील हे खूप मोलाची भूमिका बजावत असतात. अशातच ठाणे रेल्वेस्थानकावरील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे, जो व्हायरल होण्यामागे कारणही तसेच आहे. कारण हा सीसीटीव्ही कॅमेरा स्थिर राहण्याऐवजी चक्क वेगाने फिरताना दिसत होता, जो पाहताना छतावरील पंखा फिरतोय की काय असे भासत होते.

या अनोख्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा व्हिडीओ मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाश्याने आपल्या मोबाइल कॅमेऱ्यात रेकॉर्ड केला आहे. हा फिरणारा सीसीटीव्ही कॅमेरा जास्त वेळ पाहिल्यास तुमची मान दुखू शकते. रेल्वेस्थानकावर पाळत ठेवणारा हा कॅमेरा सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटीझन्सचे याकडे लक्ष वेधून घेतले आहे. या कॅमेरात काहीतरी तांत्रिक बिघाड असल्याने तो अशाप्रकारे फिरत होता असे काहींनी सांगितले.

नीट प्रकरणात सहा आरोपींना काँग्रेस कार्यालयातून अटक? Video समोर येताच ‘हे’ सत्यही आलं बाहेर, पोलिसांनी अटक केली पण..

सापांची अशी अनोखी जोडी पाहून लोक अवाक्; म्हणाले, “रस्त्यावरचा दुभाजक जातोय कुठे?”

“हे काय, सीसीटीव्ही कॅमेरा आहे की सिलिंग फॅन?” असा प्रश्न एका युजरने विचारला आहे. हा व्हिडीओ @mumbaimatterz नावाच्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओवर डीआरएम मुंबई सीआरने प्रतिक्रिया देत म्हटले की, संबंधित टीम घटनेची चौकशी करत आहे. यातील एका अपडेटमध्ये, नियुक्त एजन्सीने त्रुटी दूर करत सांगितले की, या समस्येचे निराकरण करण्यात आले आहे आणि ठाणे स्थानकावरील तो सीसीटीव्ही कॅमेरा आता सामान्यपणे कार्य करण्यास तयार केला आहे. या व्हिडीओवर युजर्स मजेदार कमेंट्स करत आहेत. एका युजरने लिहिले की, “मी हे काय पाहतोय यावर माझा विश्वास बसत नव्हता.” आणखी एका युजरने लिहिले की, “हा ३६० डिग्री पाळत ठेवत आहे.” दरम्यान, अनेकांनी यावर हसण्याची इमोजी शेअर केली आहे.