Indian Railways Viral Video : भारतात दररोज कोट्यवधी लोक भारतीय रेल्वेने प्रवास करतात. कमी अंतरावरील सुरक्षित प्रवासासाठी लोक ट्रेनला प्राधान्य देतात. त्यासाठी रेल्वेकडूनही प्रवाशांना सुखकर प्रवासासाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. त्यामुळे बहुतांश लोक लांबचा प्रवास असला तरी महागड्या फ्लाइटऐवजी ट्रेनने जातात. पण, सोशल मीडियावर ट्रेनचा एक धोकादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे; जो पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
लोक रेल्वेने एसी कोच किंवा स्लीपर कोच किंवा जनरल बोगीतून प्रवास करतात. मात्र, या व्हिडीओमध्ये लोक चक्क ट्रेनच्या छतावर झोपून प्रवास करताना दिसत आहेत. यावेळी लोक अगदी आरामात चालत्या ट्रेनववर झोपलेले दिसतात. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
ट्रेनच्या छतावर झोपून प्रवास
भारतीय रेल्वेने अनेक नियम केले आहेत. भारतीय रेल्वेशी संबंधित कर्मचाऱ्यांनाही या नियमांचे पालन करावे लागते. या नियमांनुसार रेल्वेगाड्या धावतात. त्यामुळे प्रवाशांसाठी अनेक नियम आहेत; जे प्रवाशांना पाळावे लागतात. प्रवाशांनी या नियमांकडे दुर्लक्ष केले, तर त्यासाठी दंड आणि तुरुंगवास अशा दोन्ही शिक्षांची तरतूद आहे. रेल्वेच्या नियमानुसार ट्रेनच्या छतावर बसून प्रवास करणे गुन्हा आहे.
पण, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये हे लोक ट्रेनच्या छतावर बसून प्रवास करीत असल्याचे दिसत आहे. हे सर्व प्रवासी आरामात झोपलेले दिसत आहेत. ते जीव धोक्यात घालून, अशा प्रकारे प्रवास करीत आहेत. झोपेत असताना मधेच एखादे मोठे वळण आले, तर ट्रेनच्या छतावरून घसरून किंवा ट्रेन भरधाव असल्याने खाली पडून जीवघेणा अपघात होऊ शकतो. या निष्काळजीपणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ एक्सवर @HansrajMeena नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे; ज्यावर लोकांकडून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. एका युजरने कमेंट करीत लिहिले, “भारतातील गरिबी दिवसेंदिवस वाढत आहे, श्रीमंत वर्ग अधिक श्रीमंत होत आहे आणि गरीब लोक अधिक गरीब होत आहेत.” आणखी एका युजरने कमेंट करीत लिहिले, “पैसे नसतील म्हणूनच लोक एवढी रिस्क घेऊन प्रवास करतात.” तर तिसऱ्या युजरने कमेंट केली, “सर, तो बेरोजगार आहे. तो ट्रेनच्या बाथरूममध्ये बसूनही प्रवास करतो.” तर काहींनी, “गरिबाला कोणी वाली नाही”, म्हणत सरकारवर निशाणा साधला आहे.