Indian Railways Viral Video : भारतीय रेल्वे ही जगातील सर्वात मोठी सार्वजनिक वाहतुकीची सेवा मानली जाते. यातून रोज लाखो लोक प्रवास करतात. कमी पैशात कमी वेळेत प्रवास करण्यासाठी प्रवासी रेल्वे सेवेचा वापर करतात. विशेषत: मुंबईसारख्या शहराचे आर्थिक गणित या रेल्वे सेवेवर अवलंबून आहे. पण, अनेक जण या सेवेचा गैरवापर करताना दिसतात. रेल्वेने प्रवास करण्यासाठी तिकीट काढणे बंधनकारक आहे, मात्र अनेक प्रवासी विनातिकीट प्रवास करताना दिसतात. अशा प्रवाशांसाठी अनेक कायदे, नियम आहेत; मात्र तरीही कसलीही भीती न बाळगता प्रवासी विनातिकीट प्रवास करतात. यात गेल्या काही दिवसांपासून अनेक आरक्षित ट्रेन्समध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढताना दिसतेय. यामुळे रेल्वे प्रशासनाने अशा प्रवाशांविरोधात आता कारवाई करण्यास सुरुवात केली आहे, ज्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामुळे तुम्हीदेखील लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान ट्रेनने विनातिकीट प्रवास करत असाल तर सावध व्हा.
रेल्वेमधून विनातिकीट प्रवास करताय? मग ‘हा’ VIDEO पाहाच, तुम्हालाही भरावा लागू शकतो ‘इतका’ दंड
IRCTC NEWS : गेल्या काही दिवसांपासून अनेक आरक्षित ट्रेन्समध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढताना दिसतेय. यामुळे रेल्वे प्रशासनाने अशा प्रवाशांविरोधात आता कारवाई करण्यास सुरुवात केली आहे,
Written by लोकसत्ता ऑनलाइन
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 25-04-2024 at 13:49 IST
TOPICSआयआरसीटीसीIRCTCभारतीय रेल्वेIndian Railwayरेल्वे तिकीटRailway Ticketरेल्वे प्रवासीRailway Passengers
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian railways irctc viral video rpf caught 21 people in ac coach without tickets from bhagalpur district of bihar sjr