सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ हे गमतीदार असतात, काही व्हिडीओ हे आश्चर्याचा धक्का देणारे असतात. असाच एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. प्रवाशांनी चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करू नका किंवा चढण्याचा प्रयत्न करू नका, असं वारंवार आवाहन केलं जात असलं तरी काही महानग असे असतात जे यातून कोणताही धडा घेत नाहीत आणि आपला जीव धोक्यात घालतात. कधी कधी ते मोठ्या अपघाताला बळी पडतात आणि मृत्यूही पत्करतात. सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. पण त्यानंतर जे घडतं ते फार धक्कादायक आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हा व्हिडीओ कानपूरमधील सेंट्रल स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक तीनचा असल्याचं सांगण्यात येत आहे. एक पुरुष प्रवासी धावत धावत प्लॅटफॉर्मवर जाण्याचा प्रयत्न करत असतानाच ट्रेनचा वेग हळूहळू वाढत असल्याचं दिसून येतं. काही सेकंदांच्या व्हिडीओमध्ये ही व्यक्ती कशीतरी गेटचं हँडल पकडते. ट्रेनमध्ये घाईघाईत चढण्याच्या नादात त्याला दरवाजावर पाय ठेवता आला नाही. यात त्याचा तोल जातो आणि तो प्लॅटफॉर्म आणि ट्रेनमधील फटीत खाली पडते. चालत्या ट्रेनखाली आल्यानंतर ही व्यक्ती जिवंती राहणार नाही, असं व्हिडीओ पाहताना मनात विचार येऊ लागतात. पण तितक्यात एखादा चमत्कारच घडावा असं दृश्य पाहून अनेकांना धक्का बसतो.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : एक वर्षांनी मालकाला भेटल्यानंतर हत्तीने मिठी मारली! मोठ्या स्वॅगमध्ये केलं स्वागत, पाहून तुम्हीही भावूक व्हाल!

ती व्यक्ती प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या मधील फटीत पडताच ट्रेनचे इमर्जन्सी ब्रेक लावले गेले आणि डझनभर लोक त्याला वाचवण्यासाठी धावले. जणू आता त्या व्यक्तीचं आयुष्यच संपलं असं वाटत असतानाच एक आरपीएफ जवान एखाद्या बंदुकीतील गोळीच्या वेगाने त्याच्या जवळ येतो आणि त्याला वर ओढून त्याचा जीव वाचवतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीला साधं खरचटलं सुद्धा नाही, तो पूर्णपणे बरा होता.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : टांझानियाच्या ‘त्या’ तरूणाने Nora Fatehi ला दिली तगडी टक्कर! ‘Dance Meri Rani’ गाण्यावरचे डान्स मूव्ह्स पाहून तुम्ही व्हाल थक्क!

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : इवल्याश्या बदकानं शिकारीसाठी पाण्यात उतरलेल्या वाघाला चक्रावून सोडलं! पहा कसं ते…

ही घटना २६ डिसेंबर २०२१ ची आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप पाहिला जात आहे. या व्हिडीओवर नेटिझन्सही जोरदार कमेंट करण्यास सुरूवात केली आहे. चालती गाडी पकडताना प्रवाशांचा तोल जाऊन अपघात होण्याचे प्रमाण जास्त असते. आशा अनेक घटना देखील घडतात. मात्र प्रवाशांनी चालती गाडी पकडण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन अनेकांनी या व्हिडीओखालील कमेंट्स सेक्शनमध्ये केलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian railways irctc viral video today train accident video viral video google trends today trending video kanpur train accident video went viral on social media prp