Indian Railways Building ‘Super App’ : भारतीय रेल्वेने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. प्रत्येक शहर ते खेड्यापर्यंत रेल्वेचे जाळं पसरलं आहे, त्यामुळे प्रत्येकाला चांगल्या सुविधा, सेवा देण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, अलीकडेच जलद प्रवासासाठी भारतीय रेल्वेच्या ताफ्यात हायटेक वंदे भारत ट्रेन दाखल झाल्या. यानंतर रेल्वे प्रशासन आता प्रवाशांच्या सोयीसाठी असे एक ॲप लाँच करत आहे, ज्याच्या माध्यमातून प्रवाशांना ट्रेन तिकीट बुकिंगपासून ट्रेन ट्रॅकिंगपर्यंत, रेल्वेबाबतची A to Z माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे.

भारतीय रेल्वे हे सुपर ॲप लॉन्च करण्याच्या तयारीत आहे, ज्यावर तुम्हाला रेल्वेसंबंधित अनेक कामे एकाच ठिकाणी करता येतील. रेल्वेच्या सुपर ॲपच्या माध्यमातून तिकीट बुकिंग ते रिअल टाइममध्ये ट्रेन ट्रॅक करणे अशी अनेक कामे करता येतील, असे सांगण्यात येत आहे. अहवालानुसार, या ॲपवर एकूण ९० कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून यासाठी तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधी लागणार आहे. CRIS द्वारे रेल्वेचे सुपर ॲप तयार केले जाईल, जे रेल्वेचे आयटी काम पाहते.

inspection of TMT drivers List of instructions for drivers thane news
टीएमटी चालकांची सकाळ संध्याकाळ तपासणी;  चालकांसाठी सुचनांची यादी
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
IRCTC website was down from Thursday morning make trouble for traveller
आयआरसीटीसीचे संकेतस्थळ बंद, प्रवाशांना मनस्ताप
buldhana vidarbha
निर्यात क्षेत्रात ‘हा’ जिल्हा पश्चिम विदर्भात अव्वल; ४६५ कोटींची निर्यात
indian express thinc our cities event
सहज, स्वस्त तंत्रज्ञानाची गरज ; इंडियन एक्सप्रेसच्या ‘थिंक – सिटीज’ परिसंवादात तज्ज्ञांचे मत
central railway loksatta
प्रवासी सेवेतून रेल्वेच्या तिजोरीत खणखणाट; अत्याधुनिकीकरणामुळे खानपान सेवा व गैर-भाडे महसुलात…
IRCTC Super App | latest indian railways news
IRCTC चा नवा ‘Super App’; ट्रेन तिकीट बुकिंगपासून हॉटेल, कॅब बुकिंगपर्यंत A to Z गोष्टी होणार एका क्लिकवर, वाचा
Mumbai western railway block
मुंबई : पश्चिम रेल्वेवर शनिवारी, मध्य रेल्वेवर रविवारी ब्लॉक

Indian Railway : भारतीय रेल्वे फक्त ‘या’ पाच ट्रेनमधून कमावते भरपूर पैसा; कमाईचे आकडे पाहून व्हाल थक्क!

सध्या रेल्वे तिकीट बुकिंगसाठी IRCTC Rail Connect चा वापर केला जातो. फोनद्वारे तिकीट बुकिंगसाठी सध्या हे एकमेव अधिकृत ॲप आहे. १०० दशलक्षाहून अधिक लोक हे ॲप वापरत आहेत.

याशिवाय Rail Madad, UTS, National Train Inquiry System, PortRead, Satark, TMS-Inspection IRCTC Rail Connect, IRCTC eCatering Food on Track सारखे ॲप्सदेखील आहेत, जे रेल्वे प्रवाशांना मदत करतात. आता रेल्वे हे सर्व ॲप्स एकाच ॲपमध्ये समाविष्ट करण्याची तयारी करत आहे.
यासह आयआरसीटीसी एअर (फ्लाइट तिकीट बुकिंग) या ॲपचादेखील त्यात समावेश केला जाईल. रेल्वेसंबंधित विविध ॲप्सच्या डाउनलोड्सची संख्या कमी करण्यासाठी आणि प्रवाशांना एकाच ठिकाणी सर्व माहिती मिळावी, यासाठी हा ॲप विकसित केला जात आहे.

सध्या आरक्षित तिकीट बुकिंगसाठी IRCTC हे एकमेव ॲप आहे. इतर खाजगी ॲप्सदेखील IRCTC द्वारे तिकीट बुकिंग सेवा देतात. रेल्वे तिकीटिंगशी संबंधित दुसरे लोकप्रिय ॲप म्हणजे UTS. या ॲपला एक कोटींहून अधिक डाऊनलोडर्स आहेत. याच्या माध्यमातून अनारक्षित रेल्वे तिकीट आणि प्लॅटफॉर्म तिकीट काढता येते. अशाप्रकारे रेल्वेचे विविध ॲप्स आहेत, ज्याचा वेगवेगळ्या रेल्वे सुविधांसाठी वापर केला जातो.

Story img Loader