Viral Video: दररोज रेल्वेने लाखो लोक प्रवास करतात. रेल्वेत अनेकांना आरक्षण मिळत नाही. जनरल डब्यातून लांब पल्ल्याचा प्रवास करावा लागतो. पण, आरक्षण डब्यात आणि एसी डब्यांमध्ये जेवण आणि पाणी भारतीय रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) दिले जाते. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक प्रवासी रेल्वेतून प्रवास करत होता. आयआरसीटीसीकडून जेवण आल्यानंतर मात्र त्याला त्या जेवणात झुरळ आढळले आहे व हा अनुभव त्याने सोशल मीडियावर शेअर करण्याचे ठरवले आहे.
अलीकडेच एका प्रवाशाने आयआरसीटीसीकडून (IRCTC) दिलेल्या जेवणाच्या ताटात झुरळ सापडल्याचा एक धक्कादायक अनुभव reddit वर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये भात, डाळ आणि दोन भाज्या, पोळी आणि गुलाबजामून आदी पदार्थांनी सजलेलं जेवणाचं ताट दिसत आहे. प्रवाशाने उत्साहाने पॅक केलेलं जेवण उघडताच गुलाबजामुनवर एक झुरळ बसलेले आढळले; ज्यामुळे त्यांच्या जेवणाच्या अनुभवात अनपेक्षित वळण आले. नक्की काय घडलं एकदा व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा पाहा.
व्हिडीओ नक्की बघा…
आपल्यातील अनेकांना ऑनलाईन एखादे पार्सल आले की, त्याचा फोटो आणि व्हिडीओ काढण्याची सवय असते. कारण – कधीकधी ऑनलाईन विकत घेतलेल्या वस्तू खराब निघतात. तर पुरावा म्हणून आपण या वस्तू परत करताना हे व्हिडीओ किंवा फोटो दाखवू शकतो. तर बहुधा असंच काही तरी या प्रवाशाने शुद्ध केलं असावे. प्रवासादरम्यान आयआरसीटीसीकडून आलेल्या पॅकबंद जेवणाला उघडण्यापूर्वी त्याचा व्हिडीओ शूट करण्यात आला आणि रेल्वे प्रशासनाचा निष्काळजीपणा उघडकीस आला. जेवणाचे ताट उघडताच त्यात गुलाबजामवर झुरळ फिरताना दिसत आहे, जे पाहून प्रवासीदेखील थक्क झाला आहे.
सोशल मीडियावर ही पोस्ट Reddit ॲपवरून @Aggravating-Wrap-266 या अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. या समस्यांचे निराकरण करण्याची आणि प्रवाशांना त्यांच्या जेवणाच्या सुरक्षिततेची आणि स्वच्छतेची काळजी न करता प्रवास करता येईल का, असा प्रश्न आता प्रवाशांसमोर पडला आहे. काही नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ व्हायरल होताच काही मजेशीर, तर संतापदेखील व्यक्त करताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत. एका युजरने कमेंट केली आहे की, ‘मिठाईमध्ये झुरळाची अचानक वाइल्डकार्ड एंट्री’, तर अनेक जण रेल्वेच्या स्वच्छतेवर प्रश्न उपस्थित करताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत.