Train Worst Seat Video : आरामात झोपून प्रवास करता यावा म्हणून लोक सहसा एसी कोचचे तिकीट बुक करतात; जेणेकरून कोणत्याही त्रासाशिवाय प्रवास करता येईल. पण, एसी कोचमध्ये आरक्षण असूनही तुम्हाला संपूर्ण प्रवासात अडचणींना सामोरे जावे लागत असेल तर? अशा वेळी पैसे वाया गेले, असे वाटते. ट्रेनमधील अप्पर आणि लोअर बर्थ प्रवासासाठी तसा सोईचा असतो. कारण- या बर्थवर झोपण्यासाठी कोणासाठी थांबून राहावे लागत नाही. त्यात लोअर बर्थ मिळाला, तर तुमचा प्रवास चांगला होतो. कारण- लोअर बर्थवरील प्रवाशाला मिडल बर्थ उघडण्याची किंवा वरच्या बर्थवर चढण्यासाठी धडपड करावी लागत नाही. पण, खरी अडचण तेव्हा निर्माण होते जेव्हा तुम्हाला अप्पर बर्थ मिळतो आणि त्यात त्याची सीट जेव्हा काचेच्या डोअरच्या अगदी जवळ असते. कारण- असाच काहीसा प्रकार ट्रेनच्या एसी कोचमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाबरोबर घडला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ट्रेनमध्ये अशा ठिकाणी सीट की, गाढ झोपेत असलेली व्यक्तीही डोळे चोळत जागी होईल

ट्रेनच्या एसी कोचमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाला अप्पर बर्थ मिळाला; पण त्याची सीट ट्रेनच्या एन्ट्री गेटला अगदी लागून होती. यामुळे संपूर्ण प्रवास त्याला रात्रभर जागून करावा लागला. कारण- या डोअरमधून प्रवासी सतत ये-जा करत होते. कधी वॉशरूममध्ये जाणारे, तर कधी टीटीची ये-जा सुरू होती. त्यामुळे संपूर्ण प्रवासादरम्यान दर पाच मिनिटांनी कोणी ना कोणी तो डोअर उघडून आत-बाहेर करण्याचा क्रम चालू ठेवत होता. त्यामुळे त्या अप्पर बर्थवरील प्रवाशाला अजिबात शांत झोप घेता आली नाही. कारण- प्रत्येक वेळी डोअर उघडताना आणि बंद करताना त्यातून मोठा आवाज येत होता. अशाने गाढ झोपेत असलेली व्यक्तीही डोळे चोळत जागी होईल, अशी स्थिती होती. तसेच त्या प्रवाशाला झोपल्यानंतर सामान चोरी होण्याचीदेखील सतत भीती वाटत होती. त्यामुळे तो प्रवासी रात्रभर ट्रेनमधील त्या डोअरच्या आवाजाने जागा राहिला.

@radioraguwanshi नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्यात प्रवाशाने एसी ट्रेनमधील प्रवासाच्या अशा वाईट अनुभवाविषयी सांगितले आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत एक दशलक्ष लोकांनी पाहिला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये युजरने लिहिलेय की, मला रात्रभर झोपू दिले नाही. दरम्यान, या व्हिडीओवर लोक खूप कमेंट्स करत आहेत. एका युजरने लिहिले की, कल्पना करा की, ही एसी नसलेल्या कोचमधील सीट असेल. दुसऱ्या युजरने लिहिलेय की, तुम्ही दुसऱ्या दिशेनं डोकं करून झोपलं पाहिजे होतं. तिसऱ्या युजरने लिहिलेय की, मी तुमचे दु:ख समजू शकतो. दरम्यान, हा व्हिडीओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्स करून जरूर कळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian railways passenger shares side upper birth worst experience near entry gate in ac coach goes viral video sjr