भारतीय रेल्वे ही देशातील सर्वांत मोठी सरकारी रेल्वे सेवा मानली जाते. अगदी खेड्यापासून ते विविध शहरांना जोडणाऱ्या या सेवेचे खूप मोठे जाळे आहे. रोज लाखो लोक या रेल्वेतून प्रवास करतात. पण, काही वेळा तिकिटाचे पूर्ण पैसे देऊनही प्रवाशांना वाईट अवस्थेतील ट्रेनमधून प्रवास करावा लागतो. एका प्रवाशाने मित्राद्वारे अशाच स्वरूपाच्या ट्रेनमधून प्रवास करतानाचा एक व्हिडीओ पोस्ट करीत संताप व्यक्त केला आहे. संबंधित प्रवासी ‘मौर्या एक्स्प्रेस’मधून प्रवास करीत होता. मात्र, या ट्रेनची अवस्था फारच वाईट दर्जाची होती. ट्रेनमधील नट-बोल्ट कुठे सैल झाले होते; तर कुठे रेल्वेच्या भिंतींवरील प्लायवूड तुटलेल्या अवस्थेत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाईट अवस्थेतील ट्रेनचा हा व्हिडीओ प्रवाशाचा मित्र राहुल याने ७ मार्च रोजी एक्स अकाउंटवर पोस्ट केला आहे. व्हिडीओ पोस्ट करीत त्याने म्हटले, “माझा एक मित्र काल 15027 मौर्या एक्स्प्रेस या ट्रेनने प्रवास करीत होता. ट्रेनची अवस्था इतकी वाईट होती की, बाहेरून हवा आत येत होती. सर्व नट आणि बोल्ट सैल होते आणि भिंती तुटलेल्या होत्या. देवाच्या कृपेने ट्रेन चालू होती एवढेच.

Video : भरमैदानात ‘नाटू नाटू’ गाण्यावर थिरकला सचिन तेंडुलकर; राम चरणसह अक्षय कुमारने दिली साथ

हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. अनेकांनी या पोस्टच्या कमेंट बॉक्समध्ये त्यांनी अशा प्रकारच्या खराब ट्रेनमधून प्रवास करतानाचा अनुभव शेअर केला आहे. एका युजरने कमेंट करीत लिहिले की, आमच्या दक्षिणेकडील रेल्वेगाड्या सुधारल्या आहेतआणि त्या स्वच्छ आहेत. पण जेव्हा उत्तरेकडून गाड्या येतात तेव्हा त्या नेहमी घाणेरड्या अवस्थेत असतात. लोकांमधील सिव्हिक सेन्सही कमी होत आहे.

दरम्यान, ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताच रेल्वेनेही यावर प्रतिक्रिया दिली आहे. संबंधित घटनेबाबत लवकरात लवकर कारवाई केली जाईल, असे संबंधित रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे. उत्तर पूर्व रेल्वेच्या लखनौ विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकाच्या अधिकृत एक्स हँडलनेदेखील पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे. अशा प्रकारे लोक अनेकदा सोशल मीडियावर ट्रेनमधून प्रवास करतानाच्या त्यांच्या तक्रारी व्यक्त करीत असतात.