Railway Update : बऱ्याचदा आपल्याला एका शहरातून दुसऱ्या शहरात विविध प्रकारच्या वस्तू घेऊन जायच्या असतात किंवा दुसऱ्याला पार्सल पाठवायच्या असतात. पण, अनेकदा अंतर फार असल्याने त्या वस्तू गाडी करून नेणे शक्य होत नाही. अशा वेळी आपण खासगी पार्सल कंपनीची मदत घेतो; पण त्यासाठी येणारा खर्च खूप जास्त होतो. अशा वेळी काही जण भारतीय रेल्वेच्या पार्सल सुविधेची मदत घेतात. अगदी कमी किमतीत तुम्हाला ट्रेनच्या मदतीने दुसऱ्या शहरात हे सामान घेऊन जाता येते. पण तुमचे पार्सल करावयाचे सामान ट्रेनमध्ये कशा प्रकारे भरले जाते ते तुम्ही कधी पाहिले आहे का? नसेल तर सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा धक्कादायक व्हिडीओ एकदा पाहा आणि ट्रेनमधून महागड्या इलेक्ट्रॅनिक वस्तू पाठविण्यापूर्वी जरा विचार करा.

तुम्ही पाहिलं असेल की, लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांमध्ये पार्सलचा एक डबा असतो. त्यात बाईकपासून ते अगदी लहान-मोठे पॅकिंग केलेले सामान भरून नेले जाते. ट्रेन ज्या स्थानकांवर थांबणार, त्या स्थानकांवर हे पार्सल सामान भरले जाते किंवा उतरवले जाते. पण, व्हिडीओमध्ये हे सामान ट्रेनमध्ये भरण्यासाठी आणि उतरवण्यासाठी अतिशय चुकीची पद्धत वापरली जात असल्याचे दिसत आहे. अनेक जण मोठ्या विश्वासाने ट्रेनमधून टीव्ही, फ्रीज, बाईक यांसारख्या विविध महागड्या वस्तू पाठवीत असतात. पण, ट्रेनमध्ये पार्सल चढविणारे वा उतरविणारे कर्मचारी या वस्तू कचरा फेकल्याप्रमाणे ट्रेनमध्ये अक्षरश: फेकतायत.

Mumbai video : why is marine drive so special for Mumbaikars
मुंबईचा मरीन ड्राईव्ह लोकांसाठी इतका खास का आहे? लोक मरीन ड्राईव्हलाच का जातात? हा Video एकदा पाहाच
Zeeshan Siddique slams Uddhav Thackeray
झिशान सिद्दिकींच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी दिला उमेदवार; खोचक…
Viral Video: Father-Daughter Dance to Anil Kapoor's 'Dhina Dhin Dhaa' song
‘धिना धिन धा’ बापलेकीने केला भन्नाट डान्स, इंटरनेटवर तुफान व्हायरल होतोय VIDEO, एकदा पाहाच
Viral Video Truck Drivers Hilarious Message on truck back side pati
“एवढीच घाई असेल तर…” ट्रक चालकाचा भन्नाट मेसेज; ट्रक मागील पाटी चर्चेत, VIDEO एकदा पाहाच
nikki tamboli on suraj chavan won bigg boss sympathy card
सूरज चव्हाण सहानुभूतीमुळे बिग बॉस जिंकला, या टीकेवर निक्की तांबोळी म्हणाली, “मी ट्रॉफी उचलली असती तर…”
a Fitness Trainer wrote message on paati
VIDEO : “… तेव्हा वजन आपोआप कमी होईल.” फिटनेस ट्रेनरची पाटी चर्चेत, पाहा व्हायरल व्हिडीओ
Grandpa and grandchild become emotional at Railway Station
आजोबा नातवाचे प्रेम! गावी जाताना ढसा ढसा रडत होता नातू, आजोबांनी दहा रुपये हातात दिले तरी…; रेल्वे स्टेशनवरील VIDEO VIRAL
suraj chavan dance on dj kratex song
Bigg Boss च्या पार्टीत सूरजचा जबरदस्त डान्स! ‘झापुक झूपक’ हुकस्टेप करत वेधलं सर्वांचं लक्ष; नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका स्थानकावर एक ट्रेन थांबली आहे, जिच्या मालडब्यात काही कर्मचारी मिळून सामान भरत आहेत. पॅकिंग केलेल्या सामानाचे पार्सल बॉक्स उचलून ते ट्रेनमध्ये फेकत आहेत. या पार्सलमध्ये दोन टीव्हींचे बॉक्सदेखील होते. ते बॉक्सही त्या कर्मचाऱ्याने तसेच आत टाकले. त्यानंतर डब्यात उपस्थित असलेले लोक ते सामान एकेक करून लावत आहेत. अशा प्रकारे लोकांचे पार्सल ट्रेनमधून इच्छित स्थळी पोहोचवले जाते. दरम्यान, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी ही अतिशय चुकीची पद्धत असल्याचे म्हटले आहे.

ऑन ड्युटी महिला पोलिस अधिकाऱ्याने मर्यादा ओलांडली, मान धरली, किस केलं अन्…; लज्जास्पद Video व्हायरल

हा व्हिडीओ @amshubhamking’s नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर लोक वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स करीत आहेत. एका युजरने लिहिले की, दुसऱ्यांना ज्ञान देताय, जेव्हा तुम्ही त्या ट्रेनमध्ये असता आणि हे लोक लोडिंगसाठी वेळ घेतात तेव्हा बोलाल की, याच लोकांमुळे उशीर झाला. दुसऱ्या एकाने लिहिले की, तुम्ही विचार करताय त्या पद्धतीने सामान भरले, तर एक तासापेक्षा जास्त वेळ लागेल. तिसऱ्या एकाने लिहिले की, यामुळेच रेल्वेचे खासगीकरण होत आहे.