Indian Railways Shocking Video : काही मंडळींना स्टंटबाजी करण्याची फारच हौस असते. ही मंडळी संधी मिळताच चित्र-विचित्र स्टंट करून लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. अनेकदा या स्टंटबाजीच्या नादात ते आपला जीव धोक्यात घालतानाही विचार करीत नाहीत. अनेकदा धावत्या ट्रेनसमोर काही जण रील्स बनवताना दिसतात. अनेकदा या रील्समध्ये लोक अशा काही भयानक गोष्टी करतात की, पाहून काळजात धडकी भरते. सध्या असाच एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात एक तरुण चक्क धावत्या ट्रेनखाली झोपून स्टंटबाजी करताना दिसतोय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल.

तरुणाची धावत्या ट्रेनच्या खाली रुळांमध्ये झोपून स्टंटबाजी

सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी अनेक तरुण व्यक्ती धावत्या ट्रेनसमोर उभे राहून स्टंट करताना दिसतात. या स्टंटबाजीत आतापर्यंत अनेकांनी आपला जीव गमावलाय. पण, त्यानंतरही लोक त्यातून धडा घेत नाहीत. असाच एक तरुण धावत्या ट्रेनच्या खाली रुळांमध्ये झोपून स्टंटबाजी करत आहे.

Eknath Shinde News
Eknath Shinde : एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार का? उदय सामंत यांनी दिलं उत्तर; म्हणाले, “त्यांनी…”
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Sachin Tendulkar Meets Vinod Kambli
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli : सचिन भेटायला आला पण विनोद कांबळीला उभंही राहता आलं नाही, मैत्रीतला ‘तो’ क्षण राज ठाकरेही पाहातच राहिले!
actor Nitin Chauhaan dies at 35
‘क्राइम पेट्रोल’ फेम अभिनेत्याचं निधन, ३५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Akali Leader Sukhbir Singh Badal Attacked at Goldan Temple
Sukhbir Singh Badal Firing : सुवर्ण मंदिराबाहेर सुखबीर सिंग बादल यांच्यावर गोळीबार! घटनेचा थरारक Video आला समोर
New CM of Maharashtra Devendra Fadnavis| BJP announced Maharashtra New Chief Minister
Devendra Fadnavis : मुख्यमंत्रि‍पदाचा मार्ग मोकळा होताच देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “एक है तो सेफ है…”
Kanpur Fire
Kanpur Fire : धक्कादायक! दिव्यामुळे घराला लागली आग; उद्योगपती पती-पत्नीसह मोलकरणीचा दुर्दैवी मृत्यू

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुण रेल्वे ट्र्रॅकच्या मधोमध जाऊन झोपला. तो तरुण रुळांच्या मधे झोपताच थोड्या वेळाने एक भरधाव ट्रेन त्या रुळांवरून गेली. ट्रेन खूप वेगात असल्याने ती काही सेकंदांत रुळांवरून पुढे गेली. यावेळी तो तरुण ट्रॅकच्या मधोमध पडून होता; पण ट्रेन जाताच त्याचा एक मित्र त्याला उठण्यास सांगतो. त्यानंतर तो खूप आनंदी होऊन तिथून उठतो; जणू काही त्याने काहीतरी मोठे धाडसी काम केले आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे केवळ व्हिडीओसाठी त्या तरुणाने अशा प्रकारे आपला जीव धोक्यात घातला होता.

बाप-लेकीच्या नात्याला फासला काळिमा! मुलीने ५० वर्षांच्या वडिलांबरोबर थाटला संसार; संतापजनक VIDEO VIRAL

हा धक्कादायक व्हिडीओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, ‘रेल्वे ट्रॅकवर जोकर’. व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी कमेंट्समध्ये संबंधित तरुणाविरोधात संताप व्यक्त केला आहे. एका युजरने लिहिले की, अशा लोकांना तुरुंगात टाकले पाहिजे. दुसऱ्या युजरने लिहिलेय की, खूप दारू प्याला असावा. तिसऱ्या युजरने लिहिलेय की, माझ्या देशाला काय झाले आहे?

Story img Loader