indian railways Shocking Video : सोशल मीडियावर रेल्वे प्रवाशांच्या मारामारीचे, तर कधी तिकीट तपासनीसांच्या अरेरावीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या रेल्वे परिसरातील असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून अनेकांनी असा सवाल उपस्थित केला आहे की, रेल्वे प्रशासनाचे या लोकांकडे लक्ष आहे का? कारण- व्हिडीओत काही लोक रेल्वेच्या अखत्यारीतील मालमत्तेचा खुलेआमपणे वापर करताना दिसतात. धक्कादायक बाब म्हणजे त्यांना रोखणारेही तिथे कोणी नाही. हा व्हि़डीओ आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय.
तुम्ही पाहिलं असेल की, अनेक महत्त्वाच्या रेल्वेस्थानकांवर ट्रेन्स स्वच्छ करण्यासाठी विशेष सुविधा असतात. तिथे पाण्याच्या पाइपलाइन्स असतात, ज्या माध्यमातून ट्रेन्स धुऊन स्वच्छ केल्या जातात. पण याच सुविधेचा वापर काही फुकटे लोक स्वत:च्या फायद्यासाठी करताना दिसतात. खुलेआमपणे हे लोक रेल्वेची मालमत्ता आपलीच मालमत्ता असल्याप्रमाणे वापरतात.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक ट्रेन रेल्वे रुळांवर उभी आहे, ज्यात काही लोक अर्धनग्नावस्थेत रेल्वेच्या पाण्याचा वापर करताना दिसतायत. हे लोक रेल्वेगाडीची स्वच्छता करणारे कर्मचारी असावेत, असा अंदाज आहे. पण, त्यातलीच एक व्यक्ती ट्रेनच्या खाली उभी राहून कंबरेला टॉवेल गुंडाळून, साबण लावून आरामात अंघोळ करतेय. अगदी आपलं घर असल्याप्रमाणे तो माणूस ट्रेनच्या बाजूला उभा राहून अंघोळ करतोय. पण, या लोकांप्रमाणेच अनेक फुकटे लोक रेल्वेच्या मालमत्तेचा दुरुपयोग करताना दिसतात. त्यामुळे तो थांबवण्यासाठी रेल्वे काय उपाययोजना करतेय का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण- अशा प्रकारे रोज अनेक लोक रेल्वेच्या अखत्यारीतील पाण्याचा वापर त्यांच्या वैयक्तिक स्वच्छतेसाठी करताना दिसतात; पण त्यांना रोखण्यासाठी तिथे कोणतीच यंत्रणा नाही.
रेल्वेसंबंधित हा व्हिडीओ @rahman2730 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, ‘घर असल्याप्रमाणे इथे अंघोळ करतोय.” पण अशा प्रकारे रेल्वेच्या मालमत्तेचा वापर करणं कितपत योग्य आहे? यावर तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंटद्वारे कळवा.