आयआरसीटीसी (IRCTC) असो वा इतर कोणतेही ऑनलाइन प्लॅटफॉर्म रेल्वे तिकीट काढताना तुम्हाला अनेक गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. पण, तुम्ही अधिक सक्रियपणे ट्रेन तिकीट बुक करण्यावर लक्ष केंद्रित करता, तेव्हा तुम्हाला कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता वाढते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे कसे काय शक्य आहे? तर होय, हे शक्य आहे. तुम्ही खालील टिप्स फॉलो करून भारतीय रेल्वेचं कन्फर्म तिकीट काही मिनिटांत मिळवू शकता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१) ट्रॅव्हल लिस्ट –

ट्रॅव्हल लिस्टदेखील तुम्हाला खूप मदत करू शकते. तुम्ही प्रवासाच्या आधीच जर ट्रॅव्हल लिस्ट तयार केली तर तिकीट बुकिंग करताना तुमचा वेळ वाचेल आणि कन्फर्म तिकीट बुकिंगसाठी नंतर धावपळ करावी लागणार नाही. कारण जेव्हाही तुम्ही तिकीट बुक करायला सुरुवात कराल, तेव्हा तुम्हाला यासाठी जास्त वेळ लागणार नाही. ट्रॅव्हल लिस्टचा सरळ अर्थ असा आहे की, तुम्ही तुमच्यासोबत प्रवास करणाऱ्या सर्व लोकांची माहिती घेऊन अगोदर एक लिस्ट तयार करा. बुकिंग सुरू होताच तुम्हाला फक्त ही लिस्ट निवडावी लागेल.

२) IRCTC –

बहुतेक लोक ऑनलाइन तिकीट बुकिंगसाठी आयआरसीटीसी (IRCTC)चा वापर करतात. त्याचा इंटरफेस थोडा लांब आहे. यामुळे यात तिकीट बुकिंग करताना थोडा जास्त वेळ लागतो. अशा परिस्थितीत तुम्ही आयआरसीटीसीऐवजी इतर ॲप्सदेखील वापरू शकता, जे तुम्हाला खूप मदत करू शकतात. पेटीएमदेखील एक चांगला पर्याय आहे, कारण त्याचा इंटरफेस चांगला आहे.

३) Tatkal Ticket Booking सेवा

तुम्ही Tatkal Ticket Booking सेवेचा वापर करत असाल तर तुम्हाला खूप सावध राहण्याची गरज आहे. यात बुकिंग सुरू होण्याच्या पाच मिनिटांपूर्वी तुम्ही लॉग इन केले पाहिजे. याचा फायदा म्हणजे तुमचा वेळ तर वाचेलच, पण बुकिंग सुरू होताच कर्न्फम तिकीट मिळण्याची शक्यताही वाढते. सहसा युजर्स याकडे लक्ष देत नाहीत. पण, तत्काळ तिकीट बुक करताना तुम्ही सर्वाधिक सक्रिय राहणे फार महत्त्वाचे आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian railways train ticket booking tips to get confirm tatkal paytm sjr