जम्मू काश्मीरला भारतातील स्वर्ग असे म्हटले जाते. हे स्वर्ग पाहण्यासाठी पर्यटक दूरून येत असतात. शुभ्र बर्फाच्या चादरीने वेढलेला हा प्रदेश अत्यंत सुंदर दिसतो आहे. शुभ्र बर्फाने वेढलेल्या प्रदेशात धावणारी ट्रेन तुम्ही कधी पाहिली आहे का? नसेल तर हा व्हिडीओ नक्की पाहा. भारतीय रेल्वेने सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एका स्टेशनवर बर्फाने वेढलेली ट्रेन दिसत आहे. हे दृश्य पाहून तुमच्या डोळ्याचे पारणे फिटेल.
जम्मू आणि काश्मीर हे मनमोहक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. हिवाळ्याच्या महिन्यांत जेव्हा बर्फवृष्टी होते तेव्हा हे सौंदर्य आणखी वाढते . हिवाळ्यात सर्वत्र शुभ्र बर्फ पसरलेला असतो ज्यामुळे पर्यटक आकर्षित होतात. निसर्गाची किमया पाहण्यासाठी पर्यटक उत्साही असतात. हेच आकर्षण ओळखून, भारतीय रेल्वेने देथखील अलीकडेच X वर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये जम्मू आणि काश्मीरच्या बर्फाच्छादित खोऱ्यांमधून रेल्वे प्रवासाची झलक दाखवली आहे. हे मोहक दृश्य पाहून नेटकरी थक्क झाले आहेत.
हेही वाचा – जेव्हा नागालँडचे मंत्री तलावात उतरतात तेव्हा..; स्वत:चा मजेशीर व्हिडीओ शेअर करत म्हणाले, “आज JCB”
व्हिडीओ शेअर केल्यानंतर त्वरीत व्हायरल झाला कारण हे दृश्य पाहणे ही खरचं एक व्हिज्युअल ट्रीट आहे. व्हिडीओमध्ये पाहू शकता की, एका स्टेशनवर बर्फाच्या जाड थराने झाकलेली ट्रेन दिसते आहे. ट्रेनचा प्रवास सुरू होताच, बर्फाच्छादित प्रदेशातील रेल्वे रुळावरून ट्रेन धावताना दिसत आहे. हा मंत्रमुग्ध करणारा व्हिडिओ मंत्रमुग्ध प्रेक्षकांना प्रचंड आवडला आहे. व्हिडीओ पाहून प्रत्येकाच्या मनात आयुष्यात एकदा तरी या रेल्वेने प्रवास करण्याची इच्छा निर्माण होईल.
हेही वाचा – भारीच की! नवरीने लग्नाच्या शालूवर कोरली लव्हस्टोरी; नवरदेवाची रिएक्शन एकदा पाहाच, Video Viral
व्हिडीओ शेअर कराताना “भारतीय रेल्वेसह बर्फाच्छादित जम्मू आणि काश्मीरचे विस्मयकारक दृश्य अनुभवा,” असे कॅप्शन लिहिले आहे. व्हिडिओने लक्ष वेधून घेतले आहे, ३६ लाखां पेक्षा जास्त वेळा हा व्हिडीओ पाहिला गेला आहे आणि त्याला जवळपास १ लाख लाईक्स मिळाले आहेत. व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. एकाने लिहिले “व्वा! विहंगम दृश्य पहा.” तर दुसऱ्याने लिहले की, “पुढच्या वर्षीचा प्रवास नक्की करणार”