Indian Railway Viral News : नवरा-बायकोमध्ये वारंवार होणाऱ्या भांडणाच्या घटना तुम्ही पाहिल्या किंवा ऐकल्या असतील, पण, नवरा-बायकोच्या भांडणामुळे दुसऱ्याचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचे तुम्ही अधी ऐकले आहे का? हे वाचताना थोडं विचित्र वाटेल; पण प्रत्यक्षात अशी घटना घडली आहे. एका जोडप्याच्या भांडणामुळे रेल्वेचे तब्बल तीन कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. रेल्वे कर्मचाऱ्याचे त्याच्या पत्नीबरोबर फोनवरून कडाक्याचे भांडण झाले. या भांडणाच्या वेळी ‘ओके’ म्हटल्याने रेल्वेला तीन कोटींचा फटका बसला आहे.
या प्रकरणानंतर पतीने पत्नीपासून घटस्फोट घेण्यासाठी न्यायालयात धाव घेतली. पतीच्या अर्जानंतर छत्तीसगड उच्च न्यायालयानेही हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे.
ड्युटीवर असताना पत्नीबरोबर भांडण
मिळालेल्या माहितीनुसार, विशाखापट्टणम येथील रहिवासी गोरा पल्लई वेंकटगिरी आणि छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यातील रहिवासी येरनाकुला मीरा यांचा १२ ऑक्टोबर २०११ रोजी विवाह झाला होता. लग्नानंतर काही काळातच वेंकटगिरी आणि मीरा यांच्याच मतभेद होऊ लागले. वेंकटगिरी यांच्या म्हणण्यानुसार, मीरा लग्नाआधी दुसऱ्या पुरुषाबरोबर प्रेमसंबंधात होती; ज्यामुळे त्यांच्या नात्यात तणाव वाढला.
एका ‘ओके’मुळे रेल्वेला ३ कोटींचा फटका
[
[
२२ मार्च २०२१ रोजी वेंकटगिरी हे ड्युटीवर होते. त्याच वेळी फोनवर त्यांचे पत्नीबरोबर भांडण झाले. वेंकटगिरी पत्नीशी भांडत असतानाच कमलूर स्टेशन मास्टरशीही बोलत होते. त्या दोघांच्या बोलण्यादरम्यान त्यांनी कमलूर स्टेशन मास्टरला ‘ओके’ असे म्हटले. त्या उत्तरातून झालेल्या गैरसमजामुळे कमलूरच्या स्टेशन मास्टरने ट्रेनला सिग्नल दिला. त्यामुळे ट्रेन गंतव्य स्थानकावर न पोहोचता थेट नक्षलग्रस्त भागात जाऊन पोहोचली. या चुकीमुळे रेल्वे विभागाचे तीन कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. या प्रकरणी वेंकटगिरी यांच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे.
या घटनेनंतर वेंकटगिरी यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला, जो सुरुवातीला कौटुंबिक न्यायालयाने फेटाळला; पण अंतिम सुनावणीत छत्तीसगड उच्च न्यायालयाने वेंकटगिरी यांच्या बाजूने निकाल दिला. न्यायालयाने असे म्हटले की, पत्नीचे आरोप सिद्ध होऊ शकत नाहीत आणि क्रूरतेच्या कारणास्तव पती घटस्फोट घेण्यास पात्र ठरला आहे.