Indian Railways Viral Video : देशातील करोडो लोक रोज भारतीय रेल्वेने प्रवास करतात. जलद, आरामदायी प्रवासासाठी रेल्वे प्रवास सोईचा मानला जातो. त्यामुळे बहुतांश प्रवासी आरक्षित तिकीट नसतानाही रेल्वेने प्रवास करण्याचा निर्णय घेतात. तुम्ही पाहिलं असेल की, काही प्रवासी तिकिटाशिवाय प्रवास करतात. बऱ्याचदा ते टीटीईकडून पकडलेही जातात. त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होतात. सध्या टीटीई आणि काही प्रवाशांचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय. ज्यात लाच घेणारा टीटीई व्हिडीओ शूट करणाऱ्या एका व्यक्तीला रेल्वेचा भलताच कायदा समजून सांगताना दिसतोय; जो ऐकून उपस्थित प्रवासीदेखील गोंधळात पडतात.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत एक टीटीई एका प्रवाशाकडून लाच घेत असल्याचा दावा केला जात आहे. टीटीई लाच स्वीकारत असताना वरील सीटवर बसलेला एक प्रवासी त्याचा व्हिडीओ शूट करत असतो. त्यावेळी दोघांमध्ये वाद होतात.
“सात वर्षं तुरुंगवास आणि सात हजार रुपये दंडाची तरतूद”
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक प्रवासी टीटीईचा व्हिडीओ बनवत आहे. त्यावर टीटीई त्याला विचारतो, “तुम्ही व्हिडीओ बनवत आहात का?” त्यावर तो तरुण, “हो मी व्हिडीओ बनवतोय”, असे उत्तर देतो. हे ऐकून टीटीई म्हणतो, “मी आता तिकिटे बनवत नाहीये. आता मी तुम्हाला खाली उतरवतो आणि मी तुम्हाला चांगलाच धडा शिकवतो. ड्युटीवर असलेल्या टीटीईचा व्हिडीओ बनवणे हा कायद्याने गुन्हा आहे. त्यासाठी तुम्हाला सात वर्षांची शिक्षा होऊ शकते. तसेच सात वर्षं तुरुंगवास आणि सात हजार रुपये दंडाची तरतूद आहे.” टीटीईच्या या उत्तरावर तो तरुण म्हणतो की, भाईसाहब, हे कुठे लिहिले आहे? यावेळी टीटीई संतापतो आणि प्रवाशाला पैसे परत करत म्हणतो की, जर तुम्हाला व्हिडीओ बनवण्याचा अधिकार असेल, तर मी तुम्हाला तुमचा अधिकार काय आहे ते दाखवतो. दरम्यान, टीटीईने सांगितलेला हा नवा कायदा ऐकून उपस्थित प्रवासीदेखील गोंधळात पडतात. अनेक जण आता खरंच असा कोणता कायदा आहे याविषयी विचारणा करीत आहेत.सात वर्षं तुरुंगवास आणि सात हजार रुपये दंडाची तरतूद
दरम्यान, टीटीई आणि प्रवाशांमधील हा व्हिडीओ @gharkekalesh नावाच्या अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर एका युजरने लिहिले, “भाईसाहेब, कृपया हा व्हिडीओ रेल्वे मंत्रालयाला पाठवा, त्या अधिकाऱ्याला आपोआप शिक्षा मिळेल.” तर दुसऱ्याने लिहिले, ‘टीटीई “साहेब, लोकांना नवीन कायदा सांगत आहेत भाऊ…” आणखी एकाने लिहिले, “हा व्हिडीओ तुफान व्हायरल करा.”