Indian Railways Viral Video : भारतातील रेल्वेस्थानकांवर नेहमी गर्दी पाहायला मिळते. या गर्दीत अनेकदा धड उभं राहायला जागा नसते, तरीही लोक गर्दी, धक्काबुक्की सहन करत रोजचा प्रवास करतात. याच गजबजलेल्या रेल्वेस्थानकांवर अनेकदा काही लोक धक्कादायक प्रकार करताना दिसतात. रील्स व्हिडीओच्या नादात ते कधी प्रवाशांना त्रास देताना तर कधी स्वत:चा जीव धोक्यात घातलाना दिसतात. सध्या अशाच प्रकारचा एका तरुणीचा संतापजनक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात भरस्थानकावरील तरुणीचे कृत्य पाहून उपस्थित लोकही संतापले.
तरुणी ज्याप्रकारे रेल्वेस्थानकात वागत होती, ते पाहून तुमच्याही तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रेल्वेस्थानकाच्या पायऱ्यांवर अनेक लोक बसलेले दिसत आहेत. याचवेळी एक तरुणी चक्कर येण्याचं नाटक करते आणि मुद्दाम खाली पडते. यानंतर ती एक एक पायरी करून सगळ्या पायऱ्या लोळत खाली जाते.
तरुणी पायऱ्यांवरुन खाली कोसळली अन्…
तरुणी पायऱ्यांवरून खाली कोसळत असताना एक काका तिला वाचवण्याचा प्रयत्न करतात. पण, ती वर खाली घसरते आणि थेट जाऊन जमिनीवर पडते. तिला पाहून मोबाइलमध्ये बिझी असणारी एक मुलगी तिच्या मदतीसाठी धावते, पण तोपर्यंत तरुणी स्वतः उठते आणि हसायला लागते.
यावरून असे दिसून येते की, ती रेल्वेस्थानकावर रील्ससाठी अशाप्रकारे स्टंटबाजी करत होती. ही गोष्ट तिथे उपस्थित लोकांनाही समजली, त्यामुळे कोणीही उठून तिची विचारपूस करण्यासाठी आले नाही, उलट तिला पाहून सगळे हसू लागले. पण, सार्वजनिक ठिकाणी तरुणीचा सुरू असलेला हा थिल्लरपणा पाहून अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
हा संतापजनक व्हिडीओ @y_iamcrazyy नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘आजकाल कोणालाही मदत करण्यासारखी दुनिया राहिलेली नाही, काय माहित रील बनवत असेल तर.’ हा व्हिडीओ पाहिल्यानंतर एका युजरने कमेंट करत लिहिले की, लोकांना रील फिव्हर झाला आहे. दुसऱ्या एकाने लिहिले की, आजकाल लोक रील्स बनवण्यासाठी काहीही करतात. तिसऱ्याने म्हटले की, हे विचित्र वेडे लोक आहेत.