Indian Railway Viral Video : बस असो वा ट्रेन, विना तिकीट प्रवास करणे हा दंडणीय गुन्हा आहे. पण असे लोक आहेत जे त्यांच्या पदाचा आणि सत्तेचा गैरवापर करतात. भारतीय रेल्वेचे असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत, ज्यात अनेकदा विनातिकीट प्रवास करणाऱ्यांबरोबर वादाचे प्रसंग घडताना दिसतात. यात सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत तिकीटविना प्रवास करणाऱ्या पोलिसांना टीटी भर ट्रेनमध्ये फटकारताना दिसतायत. हा व्हिडीओ पाहून आता अनेकांनी संताप व्यक्त केले आहे.
ही घटना राज्यराणी एक्स्प्रेस ट्रेनमधील आहे. चेअर कारच्या डब्यात तिकीट तपासताना टीटीने एका पोलिसाकडून तिकीट मागितले, पण पोलिसाने तिकीट नसल्याचे सांगितले, यावरुन दोघांमध्ये वाद सुरु झाला. तितक्यात आणखी एक टीटी तिथे येतो आणि पोलिसाबरोबर जोरदार भांडू लागतो. ही घटना २९.१०.२०२२४ रोजी घडल्याची माहिती रेल्वे सेवाने सांगितले.
“बस तुम्हाला सगळीकडे फ्री पाहिजे का?” संतापलेल्या टीटीचा पोलिसांना सवाल
हा व्हिडिओ ‘राज्यराणी एक्स्प्रेस’चा असल्याचं म्हटलं जात आहे, ज्यामध्ये चीअर कारच्या डब्यात एक पोलिस कर्मचारी सीटवर बसलेला दिसत आहे. यावेळी तिकीट तपासणारा टीसी त्यांच्याजवळ येतात, अरे… बाकीचे मूर्ख आहेत ज्यांनी आरक्षण केले आहे… बस तुम्हाला सगळीकडे फ्री पाहिजे का?
“फ्री खाता, आता फिरायचे पण फ्रीमध्येच का?”
तेवढ्यात दुसरा टीसी तिथे येत आणि रागारागात पोलीस कर्मचाऱ्यांना जागेवरुन उठायला सांगतो. यावेळी तो टीसी वारंवार तिकिट नसलेल्या लोकांशी असे बोलले जाते असे सांगताना दिसतोय. पोलीस कर्मचारी टीसाला, तुम्ही आमच्याशी बोलताय कसे, असा सवाल करतो, ज्यावर टीसी म्हणतो की, विना तिकीट प्रवास करणाऱ्यांशी कसे बोलायचे, फ्री खाता, फ्रीमध्येच फिरायचेय का? यावर चिडून पोलीस म्हणतो की, एका स्टेशननंतरच खाली उतरायचे आहे. यानंतर पुढे काय घडते हे व्हिडीओत पाहू शकता.
या प्रकरणावर ‘रेल्वे सेवा’ (@RailwaySeva) च्या अधिकृत हँडलवरुन स्पष्टीकरण दिले आहे, त्यांनी लिहिलेय की, तपासात असे आढळून आले आहे की, २९.१०.२०२४ रोजी सी-2 कोचमध्ये पोलिसांच्या वर्दीत एक पोलीस आरक्षित सीटवर बसला होता. यावेळी तिकीट तपासणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी पोलिस कर्मचाऱ्याला सीट खाली करण्यास सांगितले, त्यानंतर तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांमध्ये आणि पोलिसात जोरदार वादावादी झाली.
हा व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, तिकीट कलेक्टर आणि पोलीस कर्मचाऱ्यामध्ये वादविवाद झाला, कारण पोलीस भारतीय रेल्वेमध्ये विना तिकीट प्रवास करत होते. ज्यावर लोकांनी प्रतिक्रिया देत पोलिसांवर टीका केली आहे. एका व्यक्तीने लिहिले की, पोलिसांना वाटते की ते सर्वत्र व्हीआयपी आहेत! दुसऱ्याने लिहिले की, नियम सर्वांसाठी समान आहेत. तिसऱ्याने लिहिले की, “जोपर्यंत या देशात पोलिस निश्चित होत नाहीत तोपर्यंत ….” बरं, या संपूर्ण प्रकरणावर तुमचं काय म्हणणं आहे? कमेंट मध्ये सांगा.
© IE Online Media Services (P) Ltd