सणासुदीच्या काळात गावी किंवा पर्यटनानिमित्त दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी कन्फर्म ट्रेन तिकीट मिळणे म्हणजे खूप सरप्रायजिंग असते. विशेषत: दिवाळीत ट्रेनमध्ये कन्फर्म बर्थ मिळणे जवळपास अशक्य असते. प्रवाशांच्या प्रचंड गर्दीमुळे महिनाभर आधीच प्रतीक्षा यादी सुरू होते. पण, यंदा तुम्हीही दिवाळीनिमित्त ट्रेनने गावी जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही कन्फर्म ट्रेन तिकीट सहज मिळवू शकता.

रेल्वेने प्रवाशांसाठी नवी सेवा सुरू केली आहे. रेल्वेच्या या नव्या सुविधेमध्ये तुम्हाला ट्रेन सुटण्याच्या काही वेळ आधी कन्फर्म तिकीट मिळू शकते. तुम्हाला तुमचे कन्फर्म केलेले तिकीट ट्रेन सुटण्याच्या १० मिनिट आधी मिळू शकणार आहे.

local train block jogeshwari to Goregaon
मुंबई : जोगेश्वरी – गोरेगाव दरम्यान ब्लॉक, राम मंदिर स्थानकात लोकल थांबणार नाही
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Vidarbha Marathwada passengers facing problem due to no train between Nagpur to Sambhajinagar
नागपूर संभाजीनगरला जोडणारी एकही रेल्वेगाडी का नाही
IRCTC Refund Policy check how much refund will be given on canelled tickets of trains
IRCTC Refund Policy: ट्रेनची तिकीट रद्द केल्यावर किती ‘रिफंड’ मिळतो? जाणून घ्या सविस्तर
Vande Bharat Express ticket cancellation charges
Vande Bharat Ticket Cancellation Charges :वंदे भारत एक्स्प्रेसचे तिकीट रद्द करताय? तिकीट रद्द करताच किती रक्कम घेतली जाते? घ्या जाणून
Metro stopped, Metro Mumbai, MMRC Mumbai,
दोन स्थानकांमध्ये भुयारात मेट्रो बंद, एमएमआरसीकडून प्रवाशांची सुखरूप सुटका
Matheran Mini Toy Train , Mini Train Vistadome Coach,
माथेरानच्या राणीचा ‘विस्टाडोम’विनाच प्रवास

रेल्वेने प्रवाशांसाठी करंट तिकीट बुकिंग (Current Ticket Booking) नावाची एक नवीन सुविधा सुरू केली आहे. या सुविधेच्या मदतीने तुम्ही ट्रेन सुटण्याच्या काही वेळापूर्वी कन्फर्म तिकीट मिळवू शकता. रेल्वेतील सर्व सीट्स भरता याव्यात यासाठी रेल्वेने ही सुविधा सुरू केली आहे. यामुळे कोणतीही ट्रेन रिकामी जाणार नाही.

रेल्वेच्या सध्याच्या तिकीट सुविधेचा लाभ ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने घेता येतो. म्हणजेच तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही मोडमध्ये चालू तिकीट बुक करून कन्फर्म तिकीट मिळवू शकता. तुम्ही ऑफलाइन प्रक्रिया निवडल्यास, तुम्हाला तिकीट काउंटरवर जाऊन आरक्षण फॉर्म भरावा लागेल.

कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय मिळेल कन्फर्म तिकीट

करंट तिकीट सिस्टम अनेक वेळा खूप फायदेशीर ठरते. जर तुम्हाला आपत्कालीन परिस्थितीत कुठेतरी जायचे असेल, तर तुम्ही अतिरिक्त शुल्क न भरता कन्फर्म तिकीट मिळवू शकता. या सुविधेत तुम्हाला कन्फर्म तिकीट मिळेल की नाही, ते त्या ट्रेनमधील रिकाम्या सीट्सवर अवलंबून असेल.

सध्याच्या तिकीट सुविधेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आरक्षण चार्ट तयार झाल्यानंतरही तुम्ही तिकीट बुक करू शकता. भारतीय रेल्वेने प्रत्येक स्टेशनवर करंट तिकीट काउंटरदेखील उपलब्ध करून दिले आहे, जिथून तुम्ही तुमची सीट बुक करू शकता.