आपल्याकडच्या बहुतांश लोकांना भटक्या कुत्र्यांबद्दल अजिबात माया, आपुलकी नसते. ते दिसले की त्यांना दगड मारायचा किंवा शक्य तितक्या क्रूरपणे वागत त्यांना त्रास द्यायचा असे प्रकार गल्लोगल्ली पाहायला मिळतात. पण काही लोक मात्र या कुत्र्यांचा तिरस्कार न करता त्यांना प्रेमाची, आपुलकीची वागणूक देतात तेव्हा जे कोणी भटक्या कुत्र्यांना त्रास देतात किंवा त्यांचा तिरस्कार करतात त्यांनी एकदा तरी ख्रिस्टिना आणि युग्वेनबद्दल वाचलं पाहिजे.

हे जोडपं सुखी आयुष्याच्या शोधत जगभ्रमंतीला निघाले होते. पहिल्यांदा हे दोघंही भारतात आले. कोच्चीमध्ये वास्तव्याला असताना या दोघांची नजर एक भटक्या कुत्र्यावर केली. हा कुत्रा मरणासन्न अवस्थेत पोहोचला होता. पण इथल्या लोकांना मात्र याच्याशी काहीच घेणं देणं नव्हतं. शेवटी तो भटका कुत्रा, आपल्या लेखी या प्राण्यांना किंमत ती काय? त्यामुळे त्याच्याकडे कोणी पाहायलाही तयार नव्हतं. पण हे दोघंही मात्र त्याची सेवा करत तिथेच थांबले. हा कुत्रा जोपर्यंत ठिक होत नाही तोपर्यंत या दोघांनी त्याची काळजी घेतली. पण लवकरच आपल्याला जगाच्या प्रवासाला निघायचंय हे त्यांच्या लक्षात आलं. या कुत्र्याला इथेच सोडून जाणं काही शक्य नव्हतं, तेव्हा युक्रेनच्या या जोडप्याने त्याला दत्तक घेतलं. या दोघांनी त्याला ‘चपाती’ असं नाव ठेवलंय. त्याचा रंग चपातीसारखा म्हणून त्यांनी चपाती हे नाव ठेवलं.

वाचा : ‘LG’चा फुलफॉर्म माहितीये?

चपातीला घेऊन हे दोघंही जगाची भ्रमंती करायला निघाले. चपातीसोबत त्यांनी नेपाळ, थायलँड, म्यानमार फिलिपिन्स यासारख्या देशाची भ्रमंती केलीय. त्याला विमानाने नेताना अनेक अडचणी येतात, काहीं ठिकाणी कुत्र्यांना येण्याची परवानगी नसते पण तरीही सगळ्यांचा विरोध पत्करून ते चपातील घेऊन भ्रमंती करतात. चपाती या दोघांसाठी कुटुंबातल्या सदस्यासारखा झालाय. भलेही इथल्या लोकांच्या दृष्टीने या भटक्या प्राण्याला काहीच महत्त्व नसले तरी या दोघांसाठी हा मुका जीव मात्र सर्वकाही आहे. जे आपल्या देशातलेही नव्हते त्यांना जर या मुक्या जीवाची किंमत कळू शकते मग ज्या देशात भूतदया शिकवली जाते त्यांना या प्राण्यांबद्दल का आपुलकी वाटतं नाही हे विचार करण्यासारखं आहे नाही का!

वाचा : जाणून घ्या अमिताभ बच्चन यांच्या ट्विटच्या सुरूवातीला असणाऱ्या आकड्यांचा अर्थ