ब्रिटनमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथे एका भारतीय विद्यार्थ्याने मद्यधुंद महिलेला आपल्या फ्लॅटमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. ही घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. एका रिपोर्टनुसार, प्रीत विकल असे या भारतीय विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याचे वय २० वर्षे आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ही धक्कादायक घटना कार्डिफमधील आहे. प्रीत एका मद्यधुंद महिलेला हातात घेऊन कुठेतरी घेऊन जात असल्याचे व्हिडिओ फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल होत असून सध्या सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.
या व्हायरल होणाऱ्या सीसीटिव्ही फुटेजमध्ये आरोपी अगदी स्पष्टपणे दिसत आहे. प्रीत विकल असं या नराधमाचं नाव असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, काळोखात तो नराधम तरुणीला उचलून घेऊन कुठेतरी जात आहे. दोन वेगवेगळे सीसीटिव्ही फुटेज व्हिडीओमध्ये दिसत आहेत. हा आरोपी तरुणीला उचलून घेऊन जात आहे. मध्येच तो तिला खाली ठेवतो, पुन्हा उचलतो आणि चालायला लागतो. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ही धक्कादायक घटना कार्डिफमधील आहे.
पाहा व्हिडीओ –
उथ वेल्स पोलिसांनी ट्विटरवर या घटनेची माहिती दिली आहे. ट्विटरवर Euphorie या अकाउंटवरुन घटनेचा सीसीटव्ही फूटेज शेअर करण्यात आला आहे. या सीसीटीव्टी फूटेजमध्ये तो तरुण तिला कार्डिफ सिटी सेंटरमधून घेऊन जाताना दिसत आहे. या प्रकरणी नराधमाला ब्रिटिश यंग ऑफेंडर्स इन्स्टिट्यूशनने ६ वर्षे आणि ९ महिने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.