भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाने टेनिसला रामराम केला आहे. प्रोफेशनल टेनिसमधून आपण निवृत्त होतो आहोत असा आशय असलेली एक पोस्ट सोशल मीडियावर सानिया मिर्झाने लिहिली आहे. सोशल मीडियावर सध्या तिच्या भावूक पोस्टची चर्चा आहे.

काय म्हटलं आहे सानिया मिर्झाने

३० वर्षांपूर्वी एका सहा वर्षांच्या मुलीने पहिल्यांदा टेनिस कोर्टवर पाऊल ठेवलं. मी माझ्या आईसोबत गेले होते आणि मला तेव्हा प्रशिक्षकाने टेनिस कसं खेळायचं ते समजावून सांगितलं. मला तेव्हा वाटत होतं की टेनिस खेळण्यासाठी मी अजून लहान आहे. पण माझ्या स्वप्नांचा लढा सहाव्या वर्षीच सुरू झाला.

Sania Mirza announced her retirement will be seen for the last time in WTA 1000 events
सानिया मिर्झा (फोटो-संग्रहित छायाचित्र इंडियन एक्सप्रेस)

माझे आई वडील, बहीण, कुटुंब, प्रशिक्षक, फिजिओसह माझ्या पाठिशी उभ्या असलेल्या संपूर्ण टीमविना आजपर्यंतचा माझा प्रवास शक्य झालाच नसता. ही सगळी मंडळी माझ्या चांगल्या आणि वाईट काळात माझ्यासोबत उभी होती. मी यातल्या प्रत्येकासोबतच आनंद, अश्रू, दुःख सगळं काही वाटतं त्या भावना व्यक्त केल्या आहेत. मी त्यासाठी आज सगळ्यांचे आभार मानते आहे. तुम्ही सगळ्यांना मला माझ्या कठीण काळातही पाठिंबा दिलात. मला कायमच स्वप्न पाहण्यासाठी उद्युक्त केलंत. हैदराबादच्या एका छोट्या मुलीला स्वप्न पाहण्यासाठी नुसती हिंमतच नाही तर ती स्वप्नं साकार करण्यासाठी मदतही केली आहे. या आशयाची पोस्ट सानिया मिर्झाने लिहिली आहे. या पोस्टची चर्चा आहे.

Australian Open 2023: ग्रँडस्लॅम विजेतेपदासह कारकीर्द संपेल? सानिया मिर्झा-रोहन बोपण्णा जोडी ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत

सानियाची कामगिरी

सानिया मिर्झा दुहेरी टेनिस स्पर्धेत ३ वेळा चॅम्पियन ठरली आहे. यामध्ये २०१६ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनचं महिला दुहेरीचे विजेतेपद तिने पटकावलं. सानिया मिर्झाने महिला दुहेरीत २०१५ मध्ये विम्बल्डन आणि यूएस ओपनचे विजेतेपद मिळवलं. टेनिसच्या कारकिर्दीत ग्रँड स्लॅम एकेरीत सानियाला विजेतेपद मिळवता आलं नाही. मात्र एकेरीशिवाय तिने ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन आणि यू. एस. ओपन दुहेरी तसंच मिश्र दुहेरीत विजेतेपद मिळवलं आहे. यापूर्वीच ऑस्ट्रेलिया ओपन २०२३ हे आपले शेवटचे ग्रँडस्लॅम असेल हे सांगितले होते. तसंच ऑस्ट्रेलियन ओपननंतर सानिया दुबईत होणाऱ्या टेनिस चॅम्पियनशिपमध्ये भाग घेईल ही तिची शेवटची स्पर्धा असणार आहे. दुबईतल्या या स्पर्धेनंतर सानिया प्रोफेशनल टेनिसला अलविदा करणार आहे.

Sania Mirza
भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा .

दुबई स्पर्धेनंतर सानियाची निवृत्ती

नोव्हेंबर महिन्यात रंगल्या घटस्फोटाच्या चर्चा

नोव्हेंबर २०२२ मध्ये सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचा घटस्फोट होणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. पाकिस्तानी मीडियाने या बातम्या दिल्या होत्या. खलीज टाइम्सने हे वृत्तही दिलं होतं की सानिया आणि शोएब हे दुबईतल्या व्हिलामध्ये एकत्र राहात होते पण सानियाने ते घर सोडले आहे. तसंच सानिया वेगळं घर घेऊन तिथे आपल्या मुलासह राहते आहे. सानियाच्या घटस्फोटाबाबत सानिया किंवा शोएब मलिक यांनी कुणीही अधिकृत माहिती दिलेली नाही. अशात आता सानियाने निवृत्तीची घोषणा केली आहे.

Story img Loader