Indian Railway Viral Video: “एवढं आहे तर फर्स्ट क्लासमध्ये जा, भरपूर जागा आहे ट्रेनमध्ये थोडं ऍडजस्ट करा”, एरवी मुंबईच्या लोकलमध्ये ही वाक्य ऐकावी लागतातच. गैरसोय होत असल्याचं कुणी अवाक्षरही काढलं तरी, “तुम्ही काय ट्रेनची सीट बुक करून ठेवलीये का?” असा उलट प्रश्न केला जातो. पण खरं सांगायचं तर लोकलमध्ये ट्रेनची सीट बुक केली नसल्याने होणारा मनस्ताप लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये सीट बुक करूनही प्रवाशांना सहन करावा लागतोच. कोकणकरांनो तुम्हाला तर अगदी पटलं असेल ना? कधी माणुसकी दाखवा म्हणत तर कधी थेट अरेरावी करत आरक्षित डब्यांमध्ये चढणाऱ्या प्रवाशांचा प्रश्न उन्हाळयात तर फारच पेटून उठतो. असाच काहीसा एक प्रकार सध्या ऑनलाईन व्हायरल होत आहे. रेल्वेच्या डब्यात विनातिकीट प्रवास करणाऱ्यांच्या गर्दीमुळे तिकीट काढणाऱ्यांनाच जागा उरली नसल्याचे दृश्य या व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळतेय.

नेमका प्रसंग घडला कुठे?

आनंद विहार टर्मिनल आणि गाझीपूर दरम्यान प्रवास करणाऱ्या सुहेलदेव सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये ही घटना घडली असल्याचे समजतेय. तुम्ही बघू शकता की, स्लीपर कोच खचाखच भरलेला होता, प्रवासी जमिनीवर बसले होते, तर दोन सीट्सच्या मधल्या जागेत सुद्धा खूप लोक उभे आहेत. लोकांना झोपायला, बसायला सोडा हलायला सुद्धा जागा दिसत नाहीये.

indian railways viral video argument between tte and passenger
टीटीईने व्हिडीओ काढणाऱ्या प्रवाशाला सांगितला भलताच कायदा; “सात वर्षांचा तुरुंगवास अन्….”, पाहा संतापजनक VIDEO
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
pune metro
पुणेकरांचा नादखुळा! पुणे मेट्रोतून प्रवास करताना तरुणांनी केले असे काही, Viral Video पाहून पोटधरून हसाल
tapti ganga Express train loksatta
ताप्तीगंगा एक्स्प्रेसमध्ये जागेच्या वादावरुन राजस्थानच्या दोन प्रवाशांवर हल्ला, नंदुरबार स्थानकातील घटना
Viral video young boy sitting on railway track while talking phone video goes viral social Media
जीव एवढा स्वस्त असतो का? रेल्वे रुळावर फोनवर बोलत बसला; समोरुन ट्रेन आली अन्…VIDEO पाहून चुकेल काळजाचा ठोका
a man urinating near the gate of his car in heavy traffic on a road
Video : सुजाण नागरीकाला हे वागणं शोभतं का? ट्रॅफिकमध्ये गाडीतून उतरला, दार उघडे ठेवून केले नको ते कृत्य, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप अनावर
indian railways shocking video
ट्रेनमधून आरामात झोपून प्रवास करताय? मग ‘हा’ धक्कादायक VIDEO एकदा पाहाच, तुमच्याबरोबर घडू शकते अशी घटना
Shocking video two man fight in running local dore in Virar local video viral on social media
VIDEO: “एक चूक अन् खेळ खल्लास” विरार लोकलच्या दरवाजात दोन पुरुषांमध्ये भयंकर हाणामारी; मान धरली अन् थेट…

‘X’ वापरकर्ता , @5gqwedr, याने हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, “ट्रेन नंबर 22420 मध्ये एवढी गर्दी होती की टीसी सुद्धा ट्रेनमध्ये चढले नाहीत. गर्दीतील अर्ध्याहून अधिक लोक विनातिकीट प्रवास करत आहेत. हा स्लीपर कोच आहे, आरक्षित आहे. तरीही हे लोक जनरल तिकिटावर इथे आले आहेत. मग स्लीपर कोचचं तिकीट काढून उपयोगच काय, झोपायला काय तर बसायला पण जागा नाहीये.”

रेल्वेच्या अधिकृत ग्राहक सेवा अकाऊंटवरून पोस्टला प्रतिसाद देण्यात आला आहे. रेल्वेने प्रवाशाला तपशील शेअर करायला सांगितले होते.

दरम्यान, या पोस्टवर सुद्धा काहींनी संताप व्यक्त केला आहे. “तुम्ही फक्त तपशील मागवा. मुळात ही समस्या उद्भवतेच का? तुम्ही प्रश्न सोडवेपर्यंत सुद्धा ज्यांना त्रास व्हायचा तो होतोच, त्यांना तिकिटाचे पैसे परत देणार का?” असे प्रश्नही नेटकऱ्यांनी विचारले आहेत. या गर्दीमुळे अलीकडेच एका युजरने आपल्या बहिणीला दुखापत झाल्याचे पोस्ट करून सांगितले होते. गर्दीत हरवलेला तिचा मुलगा शोधण्यासाठी ट्रेनमधून उतरावे लागले त्यात तिला दुखापत झाली अशी तक्रार संबंधित युजरने केली होती.

Story img Loader