भारतीय रेल्वे गाड्यामधून तिकीटशिवाय प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत असून रेल्वे प्रशासनासाठी ही चिंतेची बाब आहे . दरम्यान, नुकतीच एक घटना समोर आली आहे जिथे एका टीटीईने (Travelling Ticket Examiner) विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पकडले. तिकीट शिवाय प्रवास करणाऱ्यांनी टीटीईला धक्काबुक्की केली आणि त्याला जबरदस्तीने डब्यातून बाहेर काढले. पण सर्व नाट्यमय घडमोडीने असे वळण घेतले ज्याची त्यांनी कल्पनाही केली नव्हती. विना तिकीट प्रवास करणाऱ्यांना त्यांच्या कर्माचे फळ भोगावे लागले.

हेही वाचा – ॲल्युमिनियम कॅनमधून सॉफ्ट ड्रिंक पित आहात? हा धक्कादायक व्हायरल व्हिडीओ एकदा बघाच…

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, TTE वर दोन तरुणांनी दारातच धुक्काबुक्की केली आणि त्याला मागे ढकलण्याचा प्रयत्न केला जात आहे असे दिसते. त्यानंतर व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱी व्यक्ती तिकीट नसलेल्या प्रवाशांकडे जाऊन त्यांनी TTE बरोबर गैरवर्तन केल्याबद्दल त्यांची निंदा करत होते. टीटीई फक्त त्यांचे काम करत होते. त्यानंतर तिथे TTE येऊन सांगतात की, मी प्रवाशांना सहकार्य करण्याची विनंती केली पण त्यांनी नियमांचे न करता थेट धक्काबुकी सुरू केली. यानंतर, दोन्ही प्रवाश्यांविरोधात औपचारिक तक्रार दाखल करत असल्याचे दिसते आहे. नंतर ते प्रवासी टीटीईला माफ करण्याची विनंती करत असल्याचेही दिसते.

हेही वाचा – Video: भरधाव कार थेट चहाच्या दुकानात! उल्हासनगरमधील अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद

सुरुवातीला अरहंत शेल्बी नावाच्या एक्स अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यानंतर घर का कलेश या लोकप्रिय पेजने पुन्हा पोस्ट केला आहे. व्हिडीओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एकाने लिहिले, तिकीट नाही…आणि तरीही मारहाण करत आहे, कुठून येतो इतका आत्मविश्वास. दुसऱ्याने खिल्ली उडवली, “ हा व्यक्तीने मॅक्सटर्न किंवा एल्विश यादवकडून प्रेरणा घेतलेली दिसते.”

Story img Loader