लग्नाचा दिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा दिवस असतो. हा दिवस कायम लक्षात राहावा आणि या दिवशी सगळं काही व्यवस्थित पार पडाव यासाठी या एका दिवसासाठी काही महिन्यांआधीच तयारी सुरू केली जाते. जेवण, सजावट, विधीसाठी लागणारे सामान अशा प्रत्येक लहान मोठ्या गोष्टीकडे विशेष लक्ष दिले जाते. लग्नाच्या दिवशी कोणत्या गोष्टीमध्ये अडथळा येऊ नये हा यामागचा उद्देश असतो. पण कितीही तयारी केली तरी काहीतरी गोंधळ होतो आणि त्या गडबड झालेल्या गोष्टीवरूनच ते लग्न कायम लक्षात ठेवलं जात. अशाच एका आठवणीत राहणाऱ्या लग्नातील एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये लग्नाची वरात निघाल्याचे दिसत आहे. पण या वरातीमध्ये नवरदेव घोड्यावर नाही तर चक्क गाढवावर बसलेला दिसत आहे. याचे कारण व्हिडीओमध्ये असणाऱ्या कॅप्शनमध्ये दिले आहे. वरातीसाठी घोडा न मिळाल्याने या नवरदेवाने गाढवावरून वरात काढण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयात उपस्थित मंडळीही आनंदाने सहभागी झाल्याचे दिसत आहे. पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.

आणखी वाचा : एकाच कुटुंबातील तिघांना लागली लॉटरी! प्रत्येकाला लागला ४१ लाखांचा जॅकपॉट; तिकीट विकत घेतानाच वापरली ही ट्रिक

व्हायरल व्हिडीओ :

व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनाही हसू अनावर झाले, काहींनी कमेंट करत ‘जगात असे पण लोक असतात का?’ असा प्रश्न विचारला आहे.

Story img Loader