Husband Caught Cheating: पत्नी माहेरी गेली असताना एका इंजिनिअरने गर्लफ्रेंडबरोबर खास वेळ घालवण्याचा प्लॅन केला होता. पण इंजिनिअरचा खेळ इतका फसला की पत्नीसह मेव्हण्याच्या समोर त्याचं पितळ उघडं झालं. हे प्रकरण घरातून थेट पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचलं होतं पण नेमका हा प्रकार उघड झाला तरी कसा?
उत्तर प्रदेशातील बहराइच या भागात एका इंजिनिअरला त्याच्या पत्नीने सरकारी घरात एका अन्य महिलेबरोबर पकडले. यावेळी इंजिनिअरच्या पत्नीसह तिचे दोन भाऊ सुद्धा होते. सुरुवातीला रंगेहात पकडल्यावर इंजीनिअर व त्याच्या पत्नीमध्ये जोरदार भांडण झाले होते मग त्याच्या पत्नीने गर्लफ्रेंडची सुद्धा चांगलीच शाळा घेतली. यावेळी इंजिनीअरला दोन्ही मेव्हण्यांनी बेदम चोप दिला, असेही समजतेय.
प्राप्त माहितीनुसार, सदर इंजिनिअर हे कोतवाली क्षेत्रात नलकूप कॉलोनीमध्ये अधिकारीपदावर कार्यरत आहेत. तर त्याची पत्नी सुद्धा श्रावस्ती परिसरात सरकारी शिक्षक म्हणून कार्यरत आहे, मागील काही काळापासून पत्नी आजारी असल्याने तिच्या माहेरी गेली होती. इंजिनिअरच्या पत्नीला काही जवळच्या लोकांकडून त्याच्या अफेअरविषयी माहिती मिळाली आणि आपल्या नवऱ्याला रंगेहात पकडण्यासाठी पत्नी झाशी येथील सरकारी घरी पोहोचली. मिळालेल्या माहितीनुसार खरोखरच तिला स्वतःचा नवरा वेगळ्या बाईबरोबर नको त्या अवस्थेत दिसून आला.
हे ही वाचा<< आईचा खून केला, दुसऱ्या खोलीत सासू.. मृतदेह बॅगेत भरून लेक पोलिसांकडे गेली, सांगितलं हत्येचं ‘हे’ कारण
दरम्यान, काही वेळ तर या ठिकाणी पती- पत्नीमध्ये जोरदार भांडण झाले मग इंजिनिअरच्या पत्नीने पोलिसांकडे तक्रार केली. यानंतर पोलीस स्टेशनमध्ये इंजिनिअरने आपली चूक मान्य करून पत्नीची माफी मागितली व पुन्हा असे न वागण्याचे आश्वासन दिले. यामुळे पत्नीनेच माघार घेत पोलिसांकडे केलेली तक्रार मागे घेतली व ते दोघे त्यांच्या घरी परतले.