कोरीअन ड्रामा आणि म्युझिकचे लाखो चाहते देशभरात आहे.अनेक तरुण-तरुणी कोरिअन अभिनेते आणि अभिनेत्रींचे लाखो चाहते आहेत. दरम्यान गेल्या काही वर्षात अनेक कोरिअन तरुणांनी भारतीय तरुणींशी लग्न केले आहे तर अनेक कोरिअन तरुणींनी देखील भारतीय तरुणांबरोबर लग्न केले आहे. अनेकदा हे कपल्स सोशल मीडियावर आपले व्हिडीओ शेअर करत असतात. दरम्यान अशा एका इन्फ्ल्युएन्सर्सचा Video सोशल मीडियावर सध्या चर्चेत आला आहे.

नेहा अरोरा हीएक भारतीय कंटेंट क्रिएटर आहे जीने जोंगसू ली या कोरियन व्यक्तीशी लग्न केले आहे. नेहा तिच्या इन्स्टाग्राम पेजवर त्यांच्या दैनंदिन आयुष्याचे किस्से शेअर करते, ज्याला ती “के-ड्रामा विथ देसी तडका” असे म्हणते.

Vishal Gawli News
Vishal Gawli : “विशाल गवळीने माझ्या मुलीला जवळ ओढलं, तिचं तोंड दाबलं आणि…”, पीडितेच्या आईने सांगितला दोन वर्षांपूर्वीचा ‘तो’ प्रसंंग
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Bipasha Basu
Video: बिपाशा बासूने शेअर केला लाडक्या लेकीचा व्हिडीओ; ‘देवी’ने जिंकली चाहत्यांची मने, पाहा व्हिडीओ
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”
Ranveer Allahbadiya
गोव्याच्या समुद्रात बुडत होते प्रसिद्ध युट्यूबर अन् त्याची गर्लफ्रेंड; IPS अधिकाऱ्याच्या कुटुंबाने वाचवले जीव, थरारक प्रसंग सांगत म्हणाला…
Aai Kuthe Kay Karte Fame Kaumudi Walokar Sangeet Ceremony
Video : “कौमुदी या अखंड ताऱ्यांच्या…”, फिल्मी स्टाइल प्रपोज, जबरदस्त डान्स अन्…; मराठी अभिनेत्रीचा ‘असा’ पार पडला संगीत सोहळा
Titeeksha Tawde
Video: मालिका संपल्यानंतर कलाकार पुन्हा आले एकत्र; तितीक्षा तावडेने शेअर केला व्हिडीओ, नेटकरी म्हणाले…

हेही वाचा –“आता हेच पाहणे बाकी होते”, चक्क बटरमध्ये भाजला आईस्क्रिम पाव, Viral Video पाहून संतापले नेटकरी

नेहाच्या अलीकडील एका व्हिडिओने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे, आणि त्याचे कारणही तसंच आहे. या व्हिडिओची सुरुवातीला नेहा प्रेक्षकांना म्हणते, “चला, माझ्या नवऱ्याच्या हिंदी स्किल्सची चाचणी घेऊया आणि त्यानंतर ती कॅमेरा जोंगसू लीकडे वळवते ज्यांनी त्यांच्या बाळाला हातात घेतलेले आहे. नेहा त्याला वेगवेगळ्या वस्तूंचे फोटो दाखवत त्या वस्तूंची हिंदी नावे विचारते. यावर जोंगसू ली अत्यंत गमतीशीर उत्तर देतो. नेहा जेव्हा त्याला चमच्याचा फोटो दाखवते, तेव्हा ली पटकन “चमचा” असे उत्तर देतो. नंतर, ती चप्पलांचा फोटो दाखवते, आणि लीचे उत्तर ऐकून तुम्हाला हसू आवरणार नाही. तो म्हणतो, “हे खूप सोपे आहे, थप्पड(चापट)!” नेहा गोंधळून जाते आणि विचारते, “थप्पड?” तर ली आत्मविश्वासाने उत्तर देतो, “थप्पड विथ चप्पल.”

हेही वाचा –समुद्रकिनारी योगा करणे बेतलं जीवावर! मोठी लाट आली अन् ती…., Viral Video पाहून काळजात धडकी भरेल

पुढे, नेहा त्याला डासाचा फोटो दाखवते. त्यावर ली अगदी तयारीत उत्तर देतो, “मला माहित आहे, ती तुमच्यासारखीच आहे ना, मच्छर.” अशाप्रकारे प्रत्येक वस्तूचे नाव सांगताना लीच्या गंमतीशीर प्रतिक्रियांमुळे संपूर्ण व्हिडिओ खूप मजेशीर होतो.

व्हिडिओ येथे पहा:
या व्हिडिओला सध्या एक मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, आणि युजर्स त्यावर मजेदार कमेंट्स करत आहेत.

एका युजरने कमेंट केली, “अरे, त्याला हेही माहित होतं – ‘वर पंखा चालतो, खाली बेबी झोपतो!'”

Story img Loader