अंजू नावाची एक भारतीय महिला पाकिस्तानात पोहचली आहे. आपण आपल्या प्रियकरासाठी पाकिस्तानात आल्याचं तिने म्हटलं आहे. प्रियकरासाठी पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरचं प्रकरण ताजं असतानाच ही नवी घटना समोर आली आहे. राजस्थानच्या भिवडीमधली विवाहिता अंजू ही थेत पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात प्रियकराला भेटण्यासाठी गेली आहे. तिच्या पतीला आणि मुलांना सोडून तिने पाकिस्तान गाठलं. ज्यानंतर तिच्या पतीने काही धक्कादायक खुलासे केले आहेत.
काय म्हटलं आहे अंजूच्या पतीने?
चार दिवसांपूर्वी अंजू मला म्हणाली की मी फिरायला जाते आहे. मी तिला विचारलं कुठे जाते आहेस? तर ती म्हणाली जयपूरला. काही दिवसात परत येईन असंही तिने सांगितलं होतं. मात्र आता ती पाकिस्तानात गेल्याचं कळतं आहे. तिने माझ्याशी What’s App कॉलवरुन संपर्क केला होता. तेव्हा तिने मला सांगितलं की मी पाकिस्तानातल्या लाहोरमध्ये आहे. दोन ते तीन दिवसांमध्ये मी परत येईन. असं सांगितलं मात्र आता ती पाकिस्तानात असल्याचं मला तुमच्याकडून कळतं आहे असं अंजूच्या पतीने ANI ला ही प्रतिक्रिया दिली आहे.
हे पण वाचा- सीमा हैदरला हवंय भारतीय नागरिकत्व, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहित म्हणाली…
पोलिसांनी या सगळ्या प्रकरणी काय म्हटलं आहे?
अंजू नावाची महिला पाकिस्तानला गेल्याचं आम्हाला मीडियात आलेल्या बातम्यांद्वारेच आम्हाला कळलं. पाकिस्तानात ती तिच्या प्रियकराकडे गेली आहे. तो मुलगा फेसबुक, व्हॉट्स अॅप कॉलिंग या माध्यमातून तिच्या संपर्कात आला होता. गुरुवारी मी फिरायला जाते आहे असं तिने तिचा पती अरविंदला सांगितलं. अरविंद आणि अंजू हे दोघंही २००७ पासून भिवाडी या ठिकाणी राहतात. मात्र २१ जुलैला ती पाकिस्तानात गेली आहे ही माहिती आमच्याकडे आहे. २०२० मध्ये अंजूने पासपोर्टसाठी अर्ज केला होता. ती पाकिस्तानात कशी गेली ते आम्हाला समजू शकलेलं नाही. असं ASP सुजीत शंकर यांनी ANI ला सांगितलं आहे. अद्याप याबाबत आम्हाला कुठलीही तक्रार मिळालेली नाही. आम्ही आमच्या पद्धतीने तपास करत आहोत असंही शंकर यांनी सांगितलं.
अंजूच्या पतीचं नाव अरविंद आहे तो खासगी कंपनीत काम करतो
अंजूच्या पतीचं नाव अरविंद असं आहे. त्याने सांगितलं की अंजू भिवाडीतल्या एका प्रायव्हेट कंपनीत डाटा एंट्री ऑपरेटर म्हणून काम करते आणि मी खासगी कंपनीत नोकरी करतो. २००५ ला आम्ही भिवाडीमध्ये भाडे तत्त्वार घर घेतलं आहे आणि त्याच घरात राहतो. आम्हाला दोन मुलंही आहेत असंही अंजूच्या पतीने सांगितलं आहे.
हे पण वाचा VIDEO: “उद्या सगळेच पाकिस्तानातून सुना आणतील” सीमा हैदरला परत पाठवा, शेजाऱ्यांनी संशय व्यक्त करत केली मागणी
राजस्थानच्या अलवरमधल्या भिवाडी या ठिकाणी अंजू तिच्या पतीसह आणि दोन मुलांसह राहात होती. ती आता तिचा प्रियकर नसरुल्लाहला भेटायला पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वाला गेली आहे. नसरुल्लाह हा मेडिकल रेप्रेंझेटिटीव्ह म्हणून काम करतो. ९० दिवसांचा व्हिसा घेऊन अंजू पाकिस्तानात गेली आहे. अंजू वाघा सीमेवरुन पाकिस्तानात पोहचली आहे.
भारतीय महिला अंजूने असं म्हटलं आहे की तिचं तिच्या प्रियकरावर म्हणजे नसरुल्लाहवर प्रेम आहे. मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही. या दोघांची ओळख फेसबुकवरुन झाली होती. आता त्याला भेटण्यासाठी ती पाकिस्तानात पोहचली आहे.