Shocking video: जेव्हा एखादी व्यक्ती संकटात असते तेव्हा त्याच्यासमोर दोनच पर्याय असतात. एकतर तो त्या त्रासाला घाबरून त्याच्यापुढे गुडघे टेकतो. नाहीतर त्याला खंबीरपणे तोंड देतो. जेव्हा त्याला वाटतं की आता सुटकेचा काहीही मार्ग नाही, तेव्हा सामना करण्याचा पर्याय शेवटचा असतो. पण अशा प्रसंगी कधीकधी अचानक एवढी शक्ती माणसाच्या आत येते की तो संकटांनाही पराभूत करतो. एका महिलेनंही असंच केलं. तिच्या दुकानात घुसलेल्या चोराला तिने असा धडा शिकवला की तो पुन्हा कुठेही चोरी करणार नाही. मात्र तिला जीवाला धोका होता तरीही तिने हार मानली नाही. ती चोराला अशी भिडली की पाहून तुमचाही डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.
तुम्ही एखाद्या प्रसंगाला कसं तोंड देता यावरुन तुमची कुवत कळते. तुमचं धाडसं तुम्हाला माणूस म्हणून भरपूर मजबुत करत. ज्यामध्ये एक चोर दुकानात घुसतो आणि लुटमार सुरू करतो. पण दुकानातील महिलेचं धाडस आणि शौर्य पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, चोराने बंदुक दाखवून महिलेला घाबरवण्याचा प्रयत्न करत चोरी करायला गेला मात्र या धाडसी महिलेने थेट चोराच्या हातातली बंदूकच हिसकावली. त्यानंतर त्याला बेदम चोप दिला. महिला ग्राहकाच्या निर्भिडपणामुळे दुकानातील एकही सामान चोरी झालं नाही. मात्र, महिलेला किरकोळ दुखापत झाली. चोराने अनेकदा हल्ला करूनही ती खंबीर राहिली आणि तिच्या दुकानात चोरी होण्यापासून रोखलं. शेवटी ती त्याला दुकानातून बाहेर काढतेच.
असं म्हणतात की चोराला चोरी करण्याची संधी मिळाली की तो दिवस किंवा रात्र पाहत नाही. योग्य संधी भेटताच तो आपला डाव साधतो. एकापेक्षा एक अशा थक्क करुन सोडणाऱ्या चोऱ्या आपण यापूर्वी पाहिल्या आणि ऐकल्यादेखील असतील. मात्र, सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये महिलेच्या धाडसाचं कौतुक होत आहे. महत्त्वाचं म्हणजे हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर देखील झपाट्याने व्हायरल झाला आहे. या महिलेचं धाडस पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> हद्दच झाली! मेट्रोमध्ये एका सीटसाठी महिलेने ओलांडली मर्यादा; VIDEO पाहून संतापले लोक
हा व्हिडीओ सोशल मीडियावर एक्सवर gharkekalesh नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हायरल व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत तर अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने म्हटलं की, प्रत्येकाने असंच केले पाहिजे, तरच चोरांना धडा मिळेल. आणखी एकाने गंमतीत म्हटलं, की त्या व्यक्तीने चोरीतून निवृत्ती घ्यावी. यासाठीच दुकानात नेहमी दोन कामगार असावेत, असा सल्ला एकाने दिला.