अंकिता देशकर

Asia Cup Babar Azam Video: आशिया चषकाचा पहिला भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पावसामुळे रद्द झाला असला तरी या सामन्यात टीम इंडियाची स्थिती फारशी बरी नव्हती हे अमान्य करता येणार नाही. यानंतर सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ- फोटो व्हायरल होत आहेत. खेळानंतर पाकिस्तानी तरुणीने विराट कोहलीचे कौतुक केल्याची चर्चा सुरु असताना आता लाइटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर करण्यात येत असलेला एक फोटो आढळला. यामध्ये काही क्रिकेटप्रेमी पाकिस्तानी क्रिकेटपटू बाबर आझमला श्रीनगरमधील प्रसिद्ध लाल चौकात खेळताना पाहत असल्याचे दिसतेय. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम भारतीय स्टार फलंदाज विराट कोहलीचा सर्वात जलद २००० धावांचा विक्रम मोडण्याच्या तयारीत असतानाचा हा फोटो असल्याचे समजतेय.

PAK vs SA Corbin Bosch takes wicket on first ball of Test career to create new record
PAK vs SA: पदार्पणाच्या कसोटीत आफ्रिकेच्या खेळाडूने पहिल्याच चेंडूवर केला मोठा विक्रम, १३५ वर्षांत पहिल्यांदाच घडलं असं काही
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
Vijay Hazare Trophy Mumbai Beat Arunachal Pradesh by 9 Wickets Under Shardul Thakur Captaincy
Vijay Hazare Trophy: शार्दूल ठाकूरच्या नेतृत्वात मुंबईने उडवला अरुणाचलचा धुव्वा; अवघ्या ३३ चेंडूत जिंकला सामना
Jasprit Bumrah Bowled Out Travis Head on Duck and Breaks Anil Kumble Record of Most Wickets At MCG IND vs AUS
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाचा तारणहार हेड असा झाला त्रिफळाचीत; जसप्रीत बुमराहने नावावर केला अनोखा विक्रम, पाहा VIDEO
Shreyas Iyer 40 Runs Inning Made Mumbai Win in Low Scoring Match vs Hyderabad Vijay Hazare Trophy
Shreys Iyer: श्रेयस अय्यरची कमाल, ९व्या क्रमांकावर फलंदाजीला आला अन् २० चेंडूत पालटला सामना; मुंबईचा दणदणीत विजय
Pakistan become 1st team to whitewash South Africa at home in ODI bilaterals PAK vs SA
PAK vs SA: पाकिस्तान संघाने एकतर्फी मालिका विजय मिळवत घडवला इतिहास, ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच संघ
Pakistan Beat South Africa by 80 Runs and Seal ODI Series
PAK vs SA: पाकिस्तान क्रिकेट बोर्डात गोंधळ आणि बंडाळ्या पण संघाची कमाल; आफ्रिकेला घरच्या मैदानावर दिला दणका
IND vs AUS Isa Guha Racial Comment on Jasprit Bumrah During Gabba Test Called him primates
IND vs AUS: पुन्हा मंकीगेट प्रकरण? जसप्रीत बुमराहवर महिला कमेंटेटरने केली वर्णभेदात्मक टिप्पणी, गाबा कसोटीत नव्या वादाला फुटलं तोंड

काय होत आहे व्हायरल?

ट्विटर यूजर Qurat यांनी व्हायरल फोटो आपल्या प्रोफाइलवर शेअर केला आहे.

अन्य यूजर्स देखील हि पोस्ट मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत.

तपास:

त्यामुळे आम्ही गूगल किवर्ड सर्च द्वारे आमचा तपास केला. आम्ही, ‘Srinagar Lal Chowk’ असे किवर्ड वापरून बातम्या शोधल्या. आम्हाला एक बातमी सापडली, ज्यामध्ये असे म्हटले आहे की ते चांद्रयान 3 मून लँडिंगच्या वेळी लाल चौकात लाईव्ह स्ट्रीमिंग सुरु झाले होते. हिंदुस्थान टाइम्सने यासंदर्भात वृत्त दिले होते.

त्यानंतर आम्ही, ‘Srinagar Lal chowk’ आणि ‘Srinagar Chandrayaan 3’ असे ट्विटर वर शोधले.

आम्हाला बरेच परिणाम ट्विटर वर मिळाले ज्यातुन आम्हाला मूळ फोटो सापडला.

चांद्रयान 3 लँडिंगचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहत असलेल्या लोकांचा व्हिडिओ देखील आम्हाला आढळला.

आम्हाला हा फोटो एका बातमीत सापडला.

Wave of Jubilation Sweeps Across J&K As Chandrayaan-3 successfully Lands on Moon

रिपोर्ट मध्ये नमूद केले आहे: माहिती आणि जनसंपर्क संचालनालय (DIPR) ने हे लाईव्ह स्ट्रीमिंग आयोजित केले होते. चांद्रयान-3 च्या या विजयी लँडिंगचे साक्षीदार होण्यासाठी विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी एकत्र आले होते.

निष्कर्ष: काश्मीरमध्ये बाबर आझमची फलंदाजी पाहणाऱ्या लोकांचा व्हायरल फोटो एडिट केलेला आहे. हा फोटो प्रत्यक्षात लोक चंद्रावर सॉफ्ट-लँडिंग करत असलेल्या विक्रम लँडरचे लाइव्ह स्ट्रीमिंग पाहतानाचा आहे.

Story img Loader