आंब्याला फळांचा राजा असे म्हणतात. उन्हाळा सुरु झाला की सर्वांना कधी एकदा गोड रसाळ आंबा खायला मिळतोय याची आतुरने लोक वाट पाहत असतात. आंब्यापासून अनेक पदार्थ देखील बनवले जातात, जे इतके स्वादिष्ट असतात जे खाल्ल्यानंतर लोक स्वत:चे बोटे चाटतात. आंब्यापासून बनवलेली एक अत्यंत स्वादिष्ट डिश म्हणजे आमरस जी महाराष्ट्र आणि गुजरातच्या प्रदेशांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. तुम्हाला हे ऐकून आनंद होईल की लोकप्रिय खाद्य मार्गदर्शक TasteAtlas नुसार, भारतातील आमरस हा आंब्यांपासून बनवलेला जगातील सर्वोत्तम पदार्थ आहे. या यादीमध्ये आंब्याच्या चटणीने देखील टॉप १० मध्ये स्थान मिळवले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारताने जगातील आंब्यांपासून तयार केलेल्या सर्वोत्तम पदार्थांच्या यादीत स्थान मिळवले आहे. आमरस या यादीत प्रथम क्रमांकावर आहे, तर आंब्याची चटणी पाचव्या क्रमांकावर आहे. TasteAtlas शेअर केलेल्या ही यादी पाहून नेटकऱ्यांना प्रचंड आनंद झाला आहे.

TasteAtlas शेअर केलेल्या माहितीनुसार, प्रथम क्रमांकावर असलेला आमरस, जे सामान्यत: मिष्टान्न म्हणून खाल्ल्या जाणाऱ्या आंब्याचा पल्प आहे, त्यापाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर थायलंडचा मँगो स्टिकी राईस आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर फिलीपिन्सचा आइस्क्रीमआहे. याशिवाय, पश्चिम बंगालमधील आम दल आणि मुंबईतील आंबा चटणी या भारतीय पदार्थांनी देखील या यादीत स्थान मिळवले.

हेही वाचा – “दरवाजा, शौचालय…जिथे जागा मिळाली तिथेच….”; छत्तीसगढ़ एक्सप्रेसची भयान स्थिती, Video Viral

चौथा क्रमांक- रुजक (जावा, इंडोनेशिया)

पाचवाक्रमांक – आंब्याची चटणी (महाराष्ट्र, भारत)

सहावा क्रमांका -आंबा द्राक्ष (हाँगकाँग, चीन)

सातवा क्रमांका- चायनीज मँगो पुडिंग (ग्वांगडोंग, चीन)

आठवा क्रमांक – रुजक सिंगूर (सुरबाया, इंडोनेशिया)

नववा क्रमांक- बाओबिंग (ग्वांगडोंग, चीन)

दहावा क्रमांक – मामुआंग नाम प्ला वान (थायलंड)

अकरावा क्रमांक – सोम तम मामुआंग (थायलंड)

बारावा क्रमांक – आंबा गझपाचो (अंदालुसिया, स्पेन)

तेरावाक्रमांक – आम दल (पश्चिम बंगाल, भारत)

चौदावा क्रमांक – आले आंबा चिकन (तुर्क आणि कैकोस बेटे)

पंधरावा क्रमांक – ग्रीन मँगो सॅलड किंवा च्रुक स्वे (कंबोडिया)

सोळावा क्रमांक – नाम प्ला वान (थायलंड)

सतरावा क्रमांक – आंबा (मुंबई, भारत)

अठरावा क्रमांक -रुजक पेटीस (सुरबाया, इंडोनेशिया)

एकोणीसवा क्रमांक – दालचिनी आंबा (तमौलीपास, मेक्सिको)

विसावा क्रमांक – रुजक कुका (पश्चिम जावा, इंडोनेशिया)

हेही वाचा – “परिस्थिती सगळं शिकवते….”, भाजी नव्हती म्हणून चिमुकल्याने डब्यात भरली मीठ अन् मिरची, शाळकरी मुलाचा Video Viral

भारतीय झाले खुश

आमरस आणि इतर भारतीय पदार्थांनी यादीत स्थान मिळवल्यानंतर देशी नेटकऱ्यांना आनंद झाला. एकाने लिहिले, “राजा, आमरससमोर सर्वजण नतमस्तक होतात. दुसऱ्याने लिहिले, “व्वा! भारताला यादीत पाहून खूप आनंद झाला!” भारतीयांनी आनंद व्यक्त केला, तर इतरांना यादी पाहून धक्का बसला. एकजण म्हणाला मारला, “तुर्कस्तानचे कोणतेही पदार्थ नाहीत?” एका वापरकर्त्याने पोस्ट केले, “ग्रीसचे कोणतेही पदार्थ नाहीत? मनोरंजक.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indias aamras ranks first in the worlds best rated dishes with mango list find out the rank of mango chutney snk