केंद्रिय मंत्रिमंडळाच्या विस्तारात निर्मला सीतारामन यांना संरक्षणमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली. इंदिरा गांधी यांच्यानंतर देशाचे संरक्षणमंत्रिपद मिळालेल्या सीतारामन या दुसऱ्या महिला आहेत. इंदिरा गांधी यांनी हे पद याआधी दोन वेळा सांभाळले होते. सीतारामन यांची संरक्षणमंत्रिपदी नियुक्ती झाल्यानंतर मोदी सरकारच्या या निर्णयावर बरीच उलटसुलट चर्चा झाली. त्यांच्या साधेपणापासून ते त्यांच्या हुशारीपर्यंतच्या अनेक चर्चांना उधाण आले होते. त्यांचा असाच साधेपणा दाखविणारा एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याला नेटिझन्सची मोठी पसंती मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या व्हिडिओमध्ये देशाच्या एका महत्त्वाच्या खात्याच्या मंत्री असलेल्या सीतारामन कैरीचे लोणचं तयार करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ निर्मला सीतारामन यांचे पती परकाल प्रभाकर यांनी २०१३ मध्ये यु-ट्यूबवर अपलोड केला होता. त्यावेळी प्रभाकर आंध्रप्रदेश सरकारमध्ये संपर्कविषयक सल्लागार म्हणून कार्यरत होते. सीतारामन या २००६ मध्ये भारतीय जनता पक्षाशी जोडल्या गेल्या. त्यानंतर त्यांनी पक्षातील प्रवक्तेपद भूषविले होते.

आता व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये निर्मला सितारामन यांच्यासोबत एक ज्येष्ठ महिलाही दिसत आहे. या दोघीमिळून अतिशय साध्या प्दधतीने घरातील लोणच्याचे काम करताना आपल्याला दिसत आहेत. हा व्हिडिओ अनेकांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. मोदी सरकार कायमच आपला साधेपणा दाखविण्यात अग्रेसर असते. त्यात हा व्हिडिओ आणखीनच भर घालत आहे. या व्हिडिओमुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षावही होत आहे.