आपल्या आजूबाजूला खूप असे लोक असतात; जे खूप खवय्ये असतात. काही लोक जगण्यासाठी खातात; तर काही जण खाण्यासाठी जगतात. जी मंडळी खाण्यासाठीच जगतात, त्यांना तुमच्या आमच्या भाषेत खवय्ये असं म्हणतात. ही खवय्ये मंडळी विविध प्रकारचे पदार्थ शोधत असतात. पण, हे पदार्थ खाण्यासाठी पैसे तर लागतातच. पैसे नसतील, तर तुमची खवय्येगिरी दीर्घ काळ चालू शकणार नाही. पण, जर तुम्हाला खाण्यासाठीच पैसे मिळाले तर? होय, हे खरं आहे. एका दुकानदारानं अनोखं चॅलेंज दिलं आहे. त्यामध्ये तुम्हाला फक्त एक ऑम्लेट खायचंय आणि त्या बदल्यात तुम्हाला एक लाखाचं बक्षीस मिळणार आहे. विश्वास बसत नाही ना, मग हा व्हिडीओ पाहाच…
ऑम्लेट खा आणि जिंका एक लाख रुपये
या चॅलेंजमध्ये तुम्हाला एक लाख रुपये मिळणार आहेत. याचा अर्थ नक्कीच हे चॅलेंज सोपं नसणार; मात्र तरीही अनेक खवय्ये हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी गर्दी करीत आहेत. दिल्लीतील एका हॉटेलबाहेरच्या एका गाड्यावर ही ऑफर देण्यात आली आहे. हे चॅलेंज नेमकं काय आहे? चला जाणून घेऊ या… तर या चॅलेंजमध्ये तुम्हाला ३१ अंड्यांचं ऑम्लेट अर्ध्या तासांत खायचं आहे, जर तु्म्ही हे ऑम्लेट अर्ध्या तासात संपवलं, तर तुम्हाला एक लाख रुपये मिळतील. या व्हिडीओमध्ये हा दुकानदार स्वत: याबाबत माहिती देत आहे. या ऑम्लेटची किंमत १३२० रुपये इतकी आहे. जर तुम्ही हे ऑम्लेट खाल्लं, तर तुम्हाला एक लाख रुपये कॅश किंवा चेक दिला जाणार आहे. काय मग तुम्ही हे चॅलेंज स्वीकारणार का?
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> सातारकर आहात का? मग हा VIDEO पाहाच… तुमच्या जुन्या आठवणी नक्की जाग्या होतील
यावेळी दुकानदारानं त्याचा पत्ताही सांगितला आहे. नवी दिल्ली, पार्ला मेट्रोशेजारी त्याचं हे दुकान आहे. सोशल मीडियावर याआधीही अशी बरीच चॅलेंज आणि ऑफर आल्या आहेत. त्याचे व्हिडीओही व्हायरल झाले आहेत. हा व्हिडीओही व्हायरल झाल्यानंतर नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेक खवय्ये हे आव्हान स्वीकारताना दिसतायत. तर मग तुम्हीदेखील पाहा तुम्हाला हे आव्हान पूर्ण करणं जमतंय का?