जुगाड करण्याच्या बाबतीत भारतीयांचा हात कोणीही पकडू शकत नाही. प्रत्येक गोष्ट मिळवणे शक्य नसल्याने अनेक भारतीय जुगाडच्या माध्यमातून ती गोष्ट हुबेहूब बनवण्याचा प्रयत्न करतात. तर काही वेळा अनेक अवघड गोष्टी जुगाडच्या मदतीने अतिशय साध्या सोप्या करून उपलब्ध करतात. सध्या असाच एका हटके देसी जुगाडचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे; जो पाहून तुम्हीही आश्चर्य व्यक्त कराल. कारण- यात एका व्यक्तीने विजेचा बल्ब सुरू करण्यासाठी स्विच बोर्डवर बटन नाही, तर चक्क पाण्याच्या नळाचा वापर केला आहे; ज्यामुळे हा जुगाड नेमका कसा काय बनवला गेला असेल, असा प्रश्न अनेक युजर्सना पडला आहे.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहिलेत, तर तुम्हाला त्यात एक स्विच बोर्ड दिसेल; ज्यावर लाईट, पंखा अशा इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्य वापरासाठी सुमारे १० स्विच आहेत. त्यावर एक होल्डरही बसवला आहे. प्रथमदर्शननी सर्व काही सामान्य दिसते; पण जेव्हा नजर स्विच बोर्डवरील पाण्याच्या नळाकडे जाते तेव्हा मात्र धक्काच बसतो. त्यावेळी स्विच बोर्डवर पाण्याच्या नळाचा काय उपयोग, असा प्रश्न पडतो. पण, जुगाडू व्यक्तीने नळाचा स्विच बोर्डवर अशा काही प्रकारे वापर केला आहे की, जे पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. व्यक्ती पाण्याचा नळ जसा फिरवते, तसा तो बल्ब चालू-बंद होतो. हा जुगाड भारतातील एक अतर्क्य जुगाडपैकी एक, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

अनेकांना हा जुगाड फार आवडला आहे; तर अनेकांनी साधे-सोपे बटन असताना असे करण्याची काय गरज होती, असा सवालही केला आहे. दरम्यान, हा जुगाड व्हिडीओ @funny_sandip नावाच्या इन्स्टा अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे; ज्यावर युजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

Story img Loader