नायजेरियन गायक-गीतकार आणि संगीत निर्माता, Ckay चे नवीन गाणं ‘लव्ह नवंतिती’ हे जगभरातील पहिल्या क्रमांकाचे गाणं बनले आहे आणि इंस्टाग्रामवर पूर्णपणे कब्जा केला आहे. या गाण्यावर असंख्य रील्सही बनवले जात आहेत. हे वेगळ सांगण्याची गरज नाही की, हा ट्रेंड व्हायरल झाला आहे, जवळजवळ प्रत्येक सोशल मीडिया वापरकर्त्याने त्यांच्या व्हिडीओ बनवताना पार्श्वभूमी हे हिट गाणं वापरत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आता, इंडिगो एअरलाइन्सच्या एअर होस्टेस, जिचं रिकाम्या फ्लाइटमधलं ‘मानिके मगे हिते’ वर डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता तिनेही नवीन ट्रेंडला फॉलो करत ‘लव्ह नवंतिती’ या गाण्यावर नाचण्याचा आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या वेळी, आयत उर्फ ​​आफरीन निसर्गाच्या सान्निध्यात मोकळ्या जागेत दिसत आहेत, गेल्या वेळी रिकाम्या फ्लाइटमध्ये तिने डान्स केला होता. व्हाईट ट्रॅक पँट, क्रॉप टॉप, स्नीकर्ससह तिने आपले केस मोकळे ठेवत डान्स केला आहे. आयतने व्हिडीओला कॅप्शन देत म्हटले आहे की, “फील द फिल्स..#ट्रेंडिंग #एक्सप्लोर #डान्स.”

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

शेअर केल्यापासून, व्हिडीओ व्हायरल झाला आहे, २ लाखांहून अधिक व्ह्यूज आणि ४९,०००हून अधिक लाईक्स मिळाले आहेत. नेटिझन्सना ताजेतवाने करणारे नृत्य आवडले आणि आयतच्या अभिव्यक्तीचे कौतुक करणाऱ्या कमेंट्सही त्यांनी केल्या आहेत. अनेकांनी आपलं मत इमोजी कमेंट करत नोंदवल आहे. काही वापरकर्त्यानी लिहिले, “व्वा खूप सुंदर,” तर दुसऱ्याने टिप्पणी दिली, “सगळच जुळून आलं, खूप सुंदर”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indigo air hostess new dances on love nwantiti song went viral watch ttg