अभिनेता अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या ‘पुष्पा’ चित्रपटाची हवा गेल्या बऱ्याच दिवसांपासून पाहायला मिळत आहे. गाणी, डायलॉग आणि जबरदस्त लूकच्या बाबतीत ‘पुष्पा’नं चाहत्यांची मनं जिंकली. अगदी बच्चे कंपनीपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांवर ‘पुष्पा’ फिवर चढलेला दिसून येतोय. कुणी पुष्पा चित्रपटाच्या डायलॉग्सवर तर कुणी गाण्यांवर आपले वेगवेगळे व्हिडीओ तयार करून ते सोशल मीडियावर शेअर करताना दिसून येत आहेत. अशात आता एअर होस्टेसवर सुद्धा हा ‘पुष्पा’ फिवर चढलेला दिसून येतोय. अगदी ‘पुष्पा’ चित्रपटातली अभिनेत्री रश्मिका मंदाना ही सुद्धा फिकी पडेल इतका भन्नाट डान्स या सुंदर एअर होस्टेसने केलाय. हा डान्स व्हिडीओ एकदा पाहिल्यानंतर तुम्ही तो वारंवार पाहत रहाल, हे मात्र नक्की.
तुम्हाला ती सुंदर एअर होस्टेस आठवतेय का? जी सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी ‘मनिके मागे हिथे’ या गाण्यावरील डान्समुळे चर्चेत आली होती. सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये असलेल्या गाण्यांवर डान्स करत ही सुंदर एअर होस्टेस आपले वेगवेगळे व्हिडीओ शेअर करत असते. सध्या सगळीकडे ‘पुष्पा’ चित्रपटाच्या गाण्यांचा बोलबोला सुरू असताना ही चर्चेत आलेली इंडिगो एअर होस्टेस तरी कशी मागे राहिल? या इंडिगो एअर होस्टेसने ‘पुष्पा’ चित्रपटाच्या ‘सामी सामी’ या गाण्यावर अप्रतिम डान्स केलाय. या व्हिडीओमध्ये एअर होस्टेस मूळ गाण्यातल्या हुक स्टेप्सना कॉपी करत डान्स करताना दिसून येतोय. तिने इतका जबरदस्त डान्स केलाय की त्यापुढे अभिनेत्री रश्मिका मंदाना सुद्धा फिकी पडेल.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : जेव्हा सिंहाचा छावा मांजरीच्या आवाजात गर्जना काढू लागतो…,पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमधल्या एअर होस्टेसचं नाव आयत उल आफरीन असं आहे. सध्या सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये असलेल्या ‘सामी सामी’ गाण्यावर केलेल्या डान्सवेळी तिने साऊथ इंडियन साडी परिधान केलेली दिसून येत आहे. साडीवर दक्षिणेतील पारंपारिक दागिन्यांचा साज चढवून ही एअर होस्टेस खूपच सुंदर दिसतेय. या पारंपारिक पेहरावात सुद्धा एअर होस्टेसने ज्या एनर्जीने डान्स केलाय, तो पाहण्यासारखा आहे. तिचे लटके झटके पाहून चाहते म्हणत आहेत की, जीव घेणार काय आता…?
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : OMG! भल्यामोठ्या भिंतीवर सरसर चढला अजगर! VIRAL VIDEO पाहून घरचेच काय तुम्हीही हैराण व्हाल
हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओ लोकांना इतका आवडलाय की आतापर्यंत या व्हिडीओला १ लाख ११ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर १८ हजारांपेक्षा जास्त लोकांनी लाईक केलंय. या व्हिडीओवर लोक मोठ्या प्रमाणात कमेंट करत एअर होस्टेसच्या डान्सचं कौतुक केलंय. अनेक युजर्सनी तर तिच्या सौंदर्याचं सुद्धा कौतुक केलंय. तिचं मनमोहक सौंदर्य पाहून लोक आणखी तिच्या प्रेमात पडू लागले आहेत.