इंडिगो एअरलाइन्सचे एक विमान खराब हवामानामुळे लाहोरजवळ पाकिस्तानामध्ये पोहचले होते. रविवारी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, विमान कोणत्याही अपघाताशिवाय भारतीय हवाई हद्दीत परतले होते, परंतु त्याआधीच विमान गुजरांवाला पर्यंत गेले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अहमदाबादला निघाललेले विमान पाकिस्तानला पोहचलं

डॉन वृत्तपत्राने वृत्त दिले आहे की फ्लाइट रडारनुसार, अमृतसरहून अहमदाबादला जाणारे भारतीय विमान शनिवारी संध्याकाळी ७.३० च्या सुमारास लाहोरमध्ये (उत्तरेकडे ४५४ नॉट्सच्या ग्राउंड नोट्ससह) दाखल झाले आणि रात्री ८.०१ वाजता भारतात परतले.

अहवालानुसार, नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाच्या (सीएए) वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ”ही असामान्य घटना नाही, कारण खराब हवामानाच्या बाबतीत ‘आंतरराष्ट्रीय स्तरावर यासाठी परवानगी’ आहे.

हेही वाचा – हेल्मेट न घालताच रिल्स बनवत होती नवरी, दिल्ली पोलिसांनी ५००० रुपयांचा ठोठवला दंड! ट्वीट करत म्हणाले, ”असा मुर्खपणा…”

पाकिस्तानाचे विमान देखील शिरले होते भारतीय हद्दीत

मे महिन्यात पाकिस्तानात मुसळधार पावसामुळे पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन (PIA) चे एक विमान भारतीय हवाई हद्दीत घुसले आणि सुमारे 10 मिनिटे तिथेच राहिले. PK248 हे विमान ४ मे रोजी मस्कतहून परतत होते आणि लाहोरमधील अल्लामा इक्बाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणार होते. मात्र, मुसळधार पावसामुळे बोईंग ७७७ विमानाच्या पायलटला तसे करणे कठीण जात होते.

हेही वाचा – डॉक्टर, पोलिस, सैनिक… विराट कोहलीचा दशावतार पाहिला का? AI फोटो पाहून यूजर्स म्हणाले, ‘तो फक्त क्रिकेट…’

खराब Visibilityमुळे बदलले उड्डानाचे मार्ग

दरम्यान, पाकिस्तानमधील विमानतळांवर खराब दृश्यमानतेमुळे उड्डाणाचे मार्ग बदलण्यात आले किंवा विमानाचे उशिरा उड्डान करण्यात आले. सीएएच्या प्रवक्त्याने सांगितले की, अल्लामा इक्बाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर ५००० मीटरवर दृश्यमानतेमुळे लाहोरसाठी हवामानाचा इशारा शनिवारी रात्री ११.३० वाजेपर्यंत वाढवण्यात आला आहे. लाहोरला जाणारी अनेक उड्डाणे खराब Visibilityमुळे इस्लामाबादकडे वळवण्यात आली

शनिवारी संध्याकाळी पाकिस्तानच्या काही भागात सोसाट्याच्या वारा आणि मेघगर्जनेसह पाऊस झाला. ‘द एक्सप्रेस ट्रिब्यूनने दिलेल्या माहितीनुसार, खैबर-पख्तुनख्वा प्रांतातील तीन लगतचे जिल्हे सर्वात जास्त प्रभावित झाले आहेत, जिथे सुमारे २९ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indigo flight from amritsar to ahmedabad diverted due to bad weather and reached pakistan airspace arrived in india after half an hour snk
Show comments