Viral Video: लांबचा पल्ला लवकर गाठण्यासाठी, वेळ वाचविण्यासाठी आणि प्रवास सुखकर होण्यासाठी लोक विमानाचा प्रवास सोईस्कर मानतात. इंडिगो विमान कंपनी प्रवाशांच्या या सुखकर प्रवासासाठी नेहमीच काहीतरी खास करीत असते. मग त्यात प्रवाशांसाठी खास चिठ्ठी किंवा पत्र लिहिणे, खाण्यासाठी विविध पदार्थ व उपवास असल्यास त्याची सोय अशा बाबींचा समावेश असतो. आज ‘इंडिगो’च्या ग्राउंड कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा सगळ्यांची मने जिंकली आहेत. प्रवाशांना पावसात भिजण्यापासून वाचविण्यासाठी ते रांगेत छत्री घेऊन उभे असल्याचे दिसले.
एक प्रवासी दिल्लीला जात असताना दिल अनोखं दृश्य पाहायला मिळालं आहे. व्हायरल झालेला हा व्हिडीओ नागालँडमधील दिमापूर विमानतळावरील आहे. प्रवाशांचे विमान लॅण्ड झाले आणि प्रवासी स्वतःचे सामान घेऊन विमानतळाबाहेर येत असतात. विमानतळाबाहेर एक बस उभी आहे. पण, तेव्हा अचानक धो-धो पाऊस सुरू झाला. अचानक आलेल्या पावसामुळे प्रवाशांची तारांबळ उडू नये आणि प्रवाशांना न भिजता, बसमध्ये जाता यावे यासाठी इंडिगो कंपनीचे ग्राउंड कर्मचारी प्रवाशांसाठी छत्री घेऊन रांगेत उभे आहेत. प्रवाशांची खास सोय करणाऱ्या इंडिगो कर्मचाऱ्यांचा हा व्हिडीओ पाहाच.
हेही वाचा…बिर्याणी खाण्याची इच्छा; तरुणींनी लढवली अशी शक्कल की… हॉस्टेलमधील ‘हा’ जुगाड VIDEO पाहाच
व्हिडीओ नक्की बघा…
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, अचानक पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे उजव्या बाजूला तीन महिला, तर डाव्या बाजूला तीन पुरुष, अशा रीतीने इंडिगो कंपनीचे कर्मचारी छत्री घेऊन रांगेत उभे आहेत. प्रवासी एकेक करून विमानतळातून बाहेर येतो आणि त्या छत्रीद्वारे न भिजता, थेट बसमध्ये जातो. तेथील उपस्थित एका प्रवाशाने कर्मचाऱ्यांचे हे सत्कृत्य पाहून, त्याचा व्हिडीओ स्वतःच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला आणि सोशल मीडियावर शेअर केला आहे; जो पाहून तुम्हालाही नक्कीच आनंद वाटेल.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @gloria.sangtam या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करीत युजरने, ‘ग्रेट जॉब @indigo.6e स्टाफ. ही घटना २८ मे २०२४ रोजी युजर दिल्लीला जात असताना घडली. अचानक पाऊस पडत होता आणि तेव्हा बसमध्ये जाण्यासाठी आणि फ्लाइटमधून उतरण्यासाठी कर्मचाऱ्यांनी केलेल्या कृत्याने सर्वच आकर्षित झाले आणि सर्वांचे डोळे पाणावले’, अशी कॅप्शन पोस्टला दिली आहे. इंडिगोच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या चांगल्या कामाचे अनेक नेटकरी कमेंट्समध्ये कौतुक करताना दिसत आहेत.