Indigo Passenger Finds Live Worm In Sandwich : गेल्या काही दिवसांपासून इंडिगो एअरलाइन्स विविध कारणांमुळे चांगलीच चर्चेत आहे. दरम्यान, पुन्ही ती एका धक्कादायक कारणामुळे चर्चेत आली आहे. दिल्लीहून मुंबईला जाणाऱ्या एका महिला प्रवाशाला इंडिगो एअरलाइन्सच्या फ्लाइटमध्ये दिलेल्या सँडविचमध्ये चक्क किडा आढळून आला आहे. संबंधित महिलेने या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यानंतर इंडिगो एअरलाइन्सने याप्रकरणी स्पष्टीकरण दिले असून महिला प्रवाशाची माफीही मागितली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सँडविचमध्ये आढळला जिवंत किडा

मिळालेल्या माहितीनुसार, खुशबू गुप्ता ही महिला शुक्रवारी दिल्लीहून मुंबईला जाणाऱ्या फ्लाइट क्रमांक 6E 6107 मधून प्रवास करत होती. यावेळी तिने एक सँडविच ऑर्डर केल्या, ज्यात चक्क जिवंत किडा वळवळत होता. यानंतर तिने एक व्हिडीओ बनवला आणि तो इन्स्टाग्रामवर शेअर केला. यावर अनेक कमेंट्स आल्या. यावेळी महिलेने इंडिगो एअरलाइन्समध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. तसेच दावा केला की, तक्रार करूनही केबिन क्रू इतर लोकांना किडे असलेले सँडविच वितरित करत आहे. तसेच विमानातील कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. यामुळे कुणाला संसर्ग झाल्यास जबाबदार कोण असेल?

श्वानाला प्रवाशांच्या सुरक्षेची चिंता! चालत्या ट्रेनमागे धावत ‘असे’ पार पाडतोय कर्तव्य; VIDEO पाहून युजर्स म्हणाले, “ह्याला रेल्वेत नोकरी….”

इंडिगोने मागितली माफी

इंडिगो एअरलाइन्सच्या प्रवक्त्याने सांगितले की, आम्हाला या घटनेची माहिती मिळाली आहे. संबंधित प्रवासी दिल्लीहून मुंबईला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये होती. आमच्या फ्लाइट क्रूने तपासणीनंतर सँडविचचे वितरण थांबवले. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. आम्ही केटरिंग सेवा देणाऱ्या कंपनीला या प्रकरणाची माहिती दिली आहे. आम्ही भविष्यात अधिक चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करू. प्रवाशाच्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. दरम्यान, या व्हिडीओवर युजर्स आता संताप व्यक्त करत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indigo passenger found live worm in sandwich indigo flight attendant reaction video sjr
Show comments