तुम्ही विमानाने प्रवास केला असेल किंवा फिल्ममध्येही तुम्ही पाहिलं असेल की विमानात बसताच पायलट किंवा विमानातील क्रू मेंबर्स आधी सर्व प्रवाशांचं स्वागत करतात. त्यानंतर काही महत्त्वाच्या सूचना देतात. पण शक्यतो त्यांना तुम्ही इंग्रजी किंवा हिंदी भाषेत बोलताना पाहिलं असेल. पण कधी कोणत्या विमानात स्थानिक भाषेत बोलताना पाहिलं आहे का? तीसुद्धा तुलू भाषा? विमानात पायलटने तुलू भाषेत सूचना दिल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
मुंबईहून मंगळुरूला जाणाऱ्या इंडिगो फ्लाइटमधला हा व्हिडीओ आहे. प्रवासी आपापल्या जागेवर बसून टेक ऑफची तयारी करत असताना फ्लाइटच्या फर्स्ट ऑफिसरने प्रवाशांना तुलू भाषेत संबोधित करून आश्चर्याचा धक्का दिलाय. या फ्लाइटमध्ये पॅसेंजर प्लीज वेलकम, प्रवासीयों का स्वागत है, असं बोलण्याऐवजी विमानातील पायलटने सर्व प्रवाशांचं चक्क तुलू भाषेत स्वागत केलंय. जे पाहून सर्व प्रवाशांना सुरुवातीला धक्का बसला. पण आपली स्थानिक भाषा ऐकून काही प्रवाशांना आनंदही झाला. ही भाषा प्रामुख्याने कर्नाटकातील दक्षिण कन्नड भागात बोलली जाते.
आणखी वाचा : किती गोड! हत्तीच्या पिल्लाला बर्फात खेळताना पाहून नेटकरी म्हणाले सगळा ताण विसरलो, पाहा VIRAL VIDEO
ही घटना २४ डिसेंबर रोजी ऑनबोर्ड फ्लाइट क्र. 6E 6051 मुंबईहून मंगळुरूला निघाली असताना फर्स्ट ऑफिसर प्रदीप पद्मशाली यांनी मंगळुरूसाठी निघालेल्या प्रवाशांना सरप्राईज करण्याची योजना आखली. विमान धावपट्टीवर आल्यानंतर त्यांनी प्रवाशांना पुढील सूचना देण्यासाठी माइक हातात उचलला आणि प्रवाशांनी जे ऐकलं सुरूवातीला त्यांच्या कानावर विश्वास बसला नाही. “ई विमाना मुंबईइद्द, पिदर्द साडी सुमारू ओन्जी गांटे आयें मिमिषा प्रार्थना मालपुना अन्दु.” असं बोलून या पायलटने तुलू भाषेत सूचना देऊन सर्व प्रवाशांचं स्वागत केलं आणि त्यांना प्रवासादरम्यान आरामदायी प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर या पायलटने याच सूचना इंग्रजीमध्ये आणि नंतर हिंदीमध्ये सुद्धा दिल्या. त्याची मातृभाषा ‘तुलू’ आहे, जी दक्षिण कन्नडमध्ये बोलली जाते. त्यावेळी आपली भाषा ऐकून आनंदित झालेले प्रवासीसुद्धा त्याला दाद देतात.
आणखी वाचा : VIRAL NEWS : बापरे! अलेक्साने १० वर्षांच्या मुलाला धोकादायक ‘आउटलेट चॅलेंज’ सुचवलं…
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : VIRAL VIDEO : काही वेळात मुखाग्नी देणार तितक्यात डोळे उघडले; सरणावरच आजोबा झाले जिवंत
याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागलाय. AwanishSharan नावाच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ लोकांना खूपच आवडू लागलाय. या व्हिडीओला आतापर्यंत १० लाख लोकांनी पाहिलं आहे.
प्रायव्हेट कंपन्यांनी भारतात टीयर-1 शहरातील लोकांना लक्षात घेऊन आपली विमान सेवा सुरू केली. टीयर-1 शहरं म्हणजे भारतातील प्रमुख महानगरं जिथं शिक्षित आणि श्रीमंत वर्ग राहतो. दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नईसारख्या शहरात आपल्या सेवेतील अडचण लक्षात घेता कंपन्यांनी टीयर-2 आणि टीयर-3 शहरांकडेही लक्ष वळवलं. त्यानंतर आपल्या काम करण्याच्या पद्धतीत आणि पॉलिसीतही त्यांना बदल करावा लागला. त्यात सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे क्षेत्रीय भाषेचा जास्तीत जास्त वापर. भाषेमार्फत प्रायव्हेट कंपन्यांनी छोट्या शहरातील लोकांना स्वतःशी जोडण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडीओसुद्धा त्याचंच एक उदाहरण आहे.